सुबोध भावेने प्रथम दिग्दर्शन केलेला ‘कट्यार काळजात घुसली’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटामुळे नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली. आजही या चित्रपटातील गाणी तितक्यात आवडीने ऐकली जातात. २०१५ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला २०२२ला सात वर्षे पूर्ण झाली होती. याच औचित्य साधून सुबोध भावेने एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. या नव्या चित्रपटाचं नाव आहे ‘संगीत मानापमान’.

‘कट्यार काळजात घुसली’नंतर सुबोध भावे आणखी एक भव्यदिव्य संगीतमय नजराणा ‘संगीत मानापमान’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा पहिला पोस्टर अभिनेत्याने शेअर केला आहे.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”

हेही वाचा – ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम मायरा वायकुळ लवकरच होणार मोठी ताई, स्वतःच दिली आनंदाची बातमी

सुबोधने ‘संगीत मानापमान’ चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर करत लिहिलं आहे, “गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या तुम्हा सर्वांना ‘संगीत मानापमान’च्या संपूर्ण संघाकडून मनःपूर्वक शुभेच्छा…येत्या दिवाळीत सजणार…मराठी परंपरेचा साज…मनामनात गुंजणार…सुरेल गीतांचा आवाज…’संगीत मानापमान’ १ नोव्हेंबरपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.”

‘संगीत मानापमान’च्या पहिल्या-वहिल्या पोस्टरवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी पोस्टरचं कौतुक केलं आहे. तर काहींनी सुबोधला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: अजय-अतुलच्या कॉन्सर्टमध्ये रोहित राऊतचा जबरदस्त परफॉर्मन्स, नेटकरी म्हणाले, “क्रिकेटमध्ये रोहित शर्मा अन्…”

दरम्यान, ‘संगीत मानापमान’ या आगामी चित्रपटात सुबोध भावे व्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार झळकणार? हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. पण चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यामुळे इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलं आहे.

Story img Loader