आतापर्यंत अनेक मराठी अभिनेत्यांनी चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका साकारल्या आहेत. खासदार डॉ. अमोल कोल्हे, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे ही त्यातलीच काही नावं आहेत. खुपते तिथे गुप्तेच्या आगामी भागात सुबोध भावे हजेरी लावणार आहे. या शोचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये सुबोधला कोणत्या अभिनेत्याने साकारलेली शिवाजी महाराजांची भुमिका आवडली असा प्रश्न विचारण्यात आला. याचं त्याने काय उत्तर दिलं ते जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मी राहुल गांधींची भूमिका करतोय तर…”, सुबोध भावेचे वक्तव्य; म्हणाला, “मी कुठल्या भूमिका…”

अवधूत गुप्तेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेबद्दल सुबोधला प्रश्न विचारला. ‘कुठल्या नटाने केलेली शिवाजी महाराजांची भूमिका आवडते’? असा प्रश्न विचारत अवधूतने सुबोधला चिन्मय मांडलेकर, डॉ. अमोल कोल्हे की सुबोध भावे हे तीन पर्याय दिले होते. या प्रश्नाचे उत्तर देताना सुबोधने डॉ. अमोल कोल्हे यांचं नाव घेतलं.

दरम्यान, सुबोधने ‘हर हर महादेव’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारली होती. अमोल कोल्हे यांनी ‘राजा शिवछत्रपती’ आणि ‘शिवप्रताप-गरुडझेप’ या चित्रपटात शिवरायांची भूमिका साकारली होती. तर, चिन्मय मांडलेकर शिवराज अष्टकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subodh bhave talks about amol kolhe chinmay mandlekar whose role played by chhatrapati shivaji maharaj he liked most hrc
Show comments