अभिनेता सुबोध भावेने ‘खुपते तिथे गुप्ते’ या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासे केले. अवधूतने सुबोधला त्याची पत्नी मंजिरीबद्दल विचारलं. मंजिरीचं शिक्षण कॅनडात झालंय, असं विचारलं असता सुबोधने त्या दोघांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलं. तसेच मंजिरीचं कुटुंब, त्याचं व मंजिरीचं लग्न, मुलांचा जन्म याबाबत त्याने माहिती दिली.
“मी सिगारेट ओढत होतो अन्…”, सुबोध भावेने मंजिरीला रक्ताने लिहिलेलं पत्र; खुलासा करत म्हणाला…
मंजिरीचं शिक्षण कॅनडात झालं, मग तुमचं कसं जमलं? असं अवधूतने विचारलं असता सुबोध म्हणाला, “आपण भारताच्या बाहेर जातो आणि एखाद्या ब्रँडेड कपड्यांच्या दुकानात जातो, तिथे आपल्याला एखादा शर्ट किंवा टी-शर्ट आवडतो आणि आपण तो बघतो, तर तो ‘मेड इन इंडिया’च असतो. तर तो एक्स्पोर्ट क्वालिटीचा माल असतो जो आपल्याला बघायला मिळत नाही. मंजिरी ही इथलीच होती, पण तिचे आई-वडील तिकडे शिफ्ट झाले, त्यामुळे ही भावंड तिकडे शिफ्ट झाली.”
पुढे सुबोधने सांगितलं, “ती ४-५ वर्षे तिकडे होती, मग भारतात परतली आणि आमचं लग्न झालं. आम्ही एकमेकांना १९९१ मध्ये भेटले होतो. आता ३२ वर्ष झालीत. लग्न झालं, कान्हा आणि मल्हार दोन मुलं झालीत. मला वाटतं की प्रत्येक घरामध्ये ज्या गोष्टी असतात, वादळ, मतभेद, भांडणं ते सगळं आमच्याकडे आहे. हे सगळं असूनही एक प्रेमाची, हक्काची जागा असते जिथे तुम्ही एकमेकांचा हात हातात घट्ट धरून प्रवास करता. आम्हाला काहीच कळत नव्हतं, त्या वयापासून आमचा प्रवास सुरू आहे. ती आठवीत होती मी १०ला होतो. आता आमची मुलं आठवी, १०वीत आहे.”
दरम्यान, मंजिरी १२ वीला असताना तिचे कुटुंब कॅनडाला शिफ्ट झाले होते. दोघांच्या घरी त्यांच्याबद्दल माहिती होती. कुटुंबीयांनी दोघांना त्यांचं शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला होता. मंजिरी परदेशात निघून गेली, पुढचं शिक्षण तिने तिथेच पूर्ण केलं. ती परदेशात गेल्यावर सुबोधने स्वतःला नाटकात गुंतवलं, त्यानंतर ४-५ वर्षांनी या दोघांचं लग्न झालं होतं.