सुचित्रा बांदेकर यांनी केवळ मराठीतच नव्हे तर बॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम’ चित्रपटात त्यांनी साकारलेलं ‘सुचित्रा भोसले’ हे पात्र प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. याशिवाय त्या रणवीर सिंहबरोबर ‘सिम्बा’ चित्रपटात झळकल्या होत्या. अलीकडेच त्या ‘इंडियन पोलीस फोर्स’ सीरिजमध्येही झळकल्या होत्या. त्यांचा बॉलीवूडमध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता याबद्दल नुकत्याच एका मुलाखतीत सुचित्रा बांदेकर यांनी भाष्य केलं आहे. सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ कार्यक्रमात त्यांना हजेरी लावली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलीवूडमध्ये गाजलेल्या ‘सिंघम’ चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळाली याबद्दल सांगताना सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, “‘सिंघम’च्या वेळी मला एका गृहस्थाचा फोन आला होता. त्यांनी मला फोनवर ‘सुचित्रा बांदेकर का? आम्हाला तुम्हाला कास्ट करायचं आहे. रोहित शेट्टी प्रोडक्शनमधून बोलतोय.’ असं सांगितलं. यावर मी बरं बरं मी सांगते असं बोलून फोन कट केला. कारण, मला त्या पहिल्या फोनवर तो ‘द रोहित शेट्टी’ आहे, तो मोठा दिग्दर्शक असं काहीच सुचलं नाही.”

हेही वाचा : लाकडी काम, सुंदर नेमप्लेट…; प्रसाद ओकने नव्या घराला दिलाय मराठमोळा टच, फोटो व्हायरल

सुचित्रा पुढे म्हणाल्या, “त्यानंतर त्या गृहस्थाने मला पुन्हा फोन केला आणि तुम्हाला कळतंय का मला काय म्हणायचंय? असा प्रश्न त्याने मला विचारला. यावर मी म्हणाले, ‘अरे रोहित शेट्टी म्हणजे ‘गोलमाल’ चित्रपट बनवणारा का?’ त्याने समोरून हो असा प्रतिसाद दिल्यावर आमच्यात चित्रपटासाठी पुढील बोलणी झाली. सरांना तुम्हाला भेटायचंय असं सांगितल्यावर मी अंधेरीला त्यांच्या ऑफिसमध्ये भेटायला गेले होते. त्यावर रोहित शेट्टी सर म्हणाले, ‘सुचित्राजी मी ‘शिवाजीराजे भोसले बोलतोय’मध्ये तुमचं काम पाहिलंय. त्यामुळे तुम्ही ‘सिंघम’मध्ये देखील काम करावं अशी माझी इच्छा आहे.’ ‘सिंघम’मध्ये माझ्याबरोबर सचिन खेडेकर सुद्धा होता. ‘शिवाजीराजे भोसले बोलतोय’मधील सचिन व माझी ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहिल्यामुळे त्याला तशीच जोडी ‘सिंघम’साठी हवी होती आणि मी चित्रपटासाठी होकार दिला.”

हेही वाचा : सुमीत पुसावळेने ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिका का सोडली? कारण सांगत म्हणाला, “माझ्या आयुष्यातील…”

“रोहित सर खूप धमाल करायचे. त्यांना माणसं कशी जपायची हे चांगलं समजतं. आम्हाला गोव्याला शूटिंग करताना खूपच मजा आली. रोहित सर खूप उत्साही असतात… त्या मानाने अजय देवगण फार शांत आहे. सेटवर काम कसं होऊन जायचं ते सुद्धा आम्हाला कळायचं नाही. ‘सिंघम’नंतर मी ‘सिम्बा’मध्ये काम केलं. आपला सिद्धार्थ सुद्धा त्यामध्ये होता. याशिवाय सारा अली खानशी माझी भेट झाली. ती फारच गोड मुलगी आहे. रणवीर सिंह प्रचंड प्रेमळ माणूस आहे. एका छान सेटअप तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा तुमचं काम सोप होतं.” असं सुचित्रा बांदेकर यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suchitra bandekar reveals her experience to working with rohit shetty ajay devgn and ranveer singh sva 00