Sukanya Mone Daughter Julia Completed Masters Degree : मराठी नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारून सुकन्या व संजय मोने यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळा ठसा उमटवला आहे. सुकन्या मोने सोशल मीडियावर देखील सक्रिय असतात. आपल्या विविध प्रोजेक्ट्सबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल त्या अनेक गोष्टी इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. अभिनेत्रीने नुकतीच सर्व चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. सुकन्या व संजय मोने यांच्या लेकीने ऑस्ट्रेलियात मोठं यश मिळवलं आहे. याबद्दल त्यांनी पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

आपल्या मुलांच्या सगळ्या इच्छा, त्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण व्हावीत अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. सुकन्या व संजय मोने यांच्या लेकीने सुद्धा एका वेगळ्या विषयात करिअर करायचं ठरवलं आणि यात जुलियाला तिच्या पालकांनी खंबीरपणे साथ दिली. सुकन्या मोने ( Sukanya Mone ) त्यांच्या प्रत्येक मुलाखतीत लेकीबद्दल भरभरून बोलत असतात. गेली काही वर्षे त्यांची लेक जुलिया परदेशात तिचं मास्टर्स पूर्ण करत होती. आता नुकतंच तिचं शिक्षण पूर्ण झालं असून, अभिनेत्रीची लेक चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे.

बुलढाणा : कुंभमेळ्यात भाविक महिला बेपत्ता, संपर्क होईना, कुटुंबीय हवालदिल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
mrinal kulkarni writes special post for mother in law
करिअर, विराजसची जबाबदारी…; मृणाल कुलकर्णींना सासूबाईंनी दिली भक्कम साथ, त्यांच्या ९० व्या वाढदिवशी अभिनेत्रीची खास पोस्ट
Lady professor marries student west bengal
Video: महिला प्राध्यापिकेचं वर्गातच विद्यार्थ्याशी झालं लग्न; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर म्हणाल्या, “हा तर…”
soumendra jena success story
Success Story: १० बाय १० ची खोली ते दुबईतील आलिशान बंगला; १७ वर्षांच्या मेहनतीने बदलले नशीब
Bhagyashree Fund , Maharashtra Kesari,
पुण्याची भाग्यश्री फंड महाराष्ट्र केसरी, म्हणते ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्याचे ध्येय
If Supriya Sule teaches some lessons to office bearers half of Maharashtra will be safe says Rupali Chakankar
सुप्रिया सुळे यांनी पदाधिकाऱ्यांना काही धडे दिले तर निम्मा महाराष्ट्र सुरक्षित होईल : रुपाली चाकणकर
upsc preparation loksatta
करिअर मंत्र

हेही वाचा : लग्नाच्या वेळी अभिनेते रमेश भाटकरांकडे होता फक्त १६ रुपये बँक बॅलन्स; मृदुला भाटकर म्हणाल्या, “प्रेम असेल तर…”

सुकन्या मोने यांची लेकीसाठी पोस्ट

सुकन्या मोने यांनी लेकीने पदव्युत्तर पदवी ग्रहण केल्याची काही क्षणचित्र सोशल मीडियावर शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्री लिहितात, “जुलिया सुकन्या संजय मोने…Master Degree In Animal Science From University Of Queensland Brisbane Australia. तिच्या पदवी ग्रहण समारंभाला गेले होते. त्याची काही स्मरणचित्रं… हळुहळू सगळी पाठवत जाईन. आमच्या आनंदात तुम्हालाही सामील करायला आवडेल.”

आपल्या आई-बाबांपेक्षा वेगळ्या क्षेत्रात जुलियाने पाऊल ठेवलं आहे. वन्यप्राणी जीवशास्त्र (वाइल्डलाइफ बायोलॉजी) म्हणजेच ‘मास्टर इन अ‍ॅनिमल सायन्स अँड मेजर इन वाइल्डलाइफ बायोलॉजी’ या विषयात तिने पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे. तिच्या आई-वडिलांना सुरुवातीला या अभ्यासक्रमाबद्दल काहीच माहीत नव्हतं. पण, या सगळ्या प्रवासात सुकन्या व संजय मोने यांनी तिला कायम पाठिंबा दिला.

हेही वाचा : “लक्ष्मी हा माझा ड्रीम रोल…”, नव्या मालिकेविषयी काय म्हणाल्या हर्षदा खानविलकर? ‘ती’ इच्छा खरी ठरली…

दरम्यान, मुग्धा गोडबोले, सीमा घोगळे, रसिका वेंगुर्लेकर, स्वानंदी टिकेकर या कलाकारांसह जुलियाचं नेटकऱ्यांनी देखील भरभरून कौतुक केलं आहे.

Story img Loader