सुकन्या व संजय मोने यांची जोडी मराठी मनोरंजनविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. चित्रपट, मालिका व नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये या जोडप्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. या दोघांना जुलिया नावाची एकुलती एक मुलगी आहे. ती उच्चशिक्षणानिमित्त परदेशात असते. २०२३मध्ये मराठी सिनेसृष्टीत गाजलेल्या ‘बाईपण भारी देवा’मध्ये सुकन्या मोनेंच्या लेकीने लहानशी भूमिका साकारली होती. या भूमिकेविषयी नुकत्याच राजश्री मराठीला दिलेल्या जुलियाने खुलासा केला आहे.

सुकन्या मोने आणि जुलियाच्या हातात सारख्याच अंगठ्या आहेत. याविषयी सांगताना अभिनेत्रीची लेक म्हणाली, ” कोणत्याही मोठ्या चित्रपटात यापूर्वी मी केव्हाच काम केलं नव्हतं. ज्यावेळी मला केदार काकाने बाईपण चित्रपटाबद्दल विचारलं. तेव्हा मी त्याच्याकडे विचार करण्यासाठी थोडावेळ मागितला होता. आईला तेव्हा माझ्या कास्टिंगबाबत काहीच कल्पना नव्हती. हे सगळे लोक आई-बाबांच्या एवढे जवळचे आहेत की, त्यांना मी कधीच नाही बोलू शकत नाही. त्यामुळे चित्रपटासाठी होकार देण्यापूर्वी केदार काकाजवळ मी गंमत म्हणून एक गोष्ट मागितली.”

shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
religious reform in india social transformation in religion hindu religious reform
पातक, प्रायश्चित्त आणि शुद्धीविचार
young man swallowed nail during carpentry
सुतारकाम करताना तरुण अचानक लोखंडी खिळा गिळतो तेव्हा…
Kark Rashi mata lakshmi
कर्क राशीमध्ये निर्माण होईल डबल लक्ष्मी राजयोग! ‘या’ ३ राशीचे भाग्य उजळणार, माता लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक काम मिळणार अपार यश
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
ramdas kadam aditya thackeray
“…म्हणून आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले”, रामदास कदमांचा टोला; म्हणाले, “आता देवा भाऊचा जप…”
Image of a lottery ticket
स्वप्नात दिसलेल्या नंबरचे लॉटरी तिकिट घेतले अन् महिला जिंकली ४२ लाख रुपये; पती म्हणाला, “मला काही हे…”

हेही वाचा : “तू मला पाहत आहेस…”, आईच्या आठवणीत तेजश्री प्रधानची भावुक पोस्ट, चाहत्यांनी दिला धीर

जुलिया आईबद्दल सांगताना म्हणाली, “आईच्या हातात एक अंगठी आहे. ती अंगठी आई मला कधीच घालू देत नाही. त्यामुळे तू माझ्याशी तशीच अंगठी करून आणलीस, तरच मी तुझ्या चित्रपटात काम करेन. मला वाटलं तशी अंगठी त्याला कुठेच मिळणार नाही पण, केदार काकाने कुठून तरी शोध लावला आणि हुबेहूब अंगठी बनवून घेतली.”

हेही वाचा : जोतिबाच्या नावानं चांगभलं! ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने जोडीदारासह घेतलं देवदर्शन, दोघांचा नववर्षाचा संकल्प वाचून कराल कौतुक

जुलिया पुढे म्हणाली, “केदार काकाने हुबेहूब बनवलेली अंगठी पाहून माझ्या मनात असं झालं की, आता या चित्रपटासाठी मला होकार कळवणं खूप गरजेचं आहे. चित्रपटाला होकार दिल्यावर केदार काकाने अनेक गोष्टी मला समजावून सांगितल्या, कथा ऐकवली. आमच्या सगळ्या गोष्टी बोलून झाल्यावर केदार काकाने या सगळ्याची कल्पना आईला दिली आणि जुलिया देखील या चित्रपटात काम करणार आहे असं तिला सांगितलं.”

Story img Loader