नाटक, मालिका, चित्रपट या सर्वच माध्यमांमध्ये अभिनेत्री सुकन्या मोनेंनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली आहे. त्यामुळे आजही त्यांचा कुठलाही चित्रपट असो, मालिका किंवा नाटक असो प्रेक्षक वर्ग तितकंच प्रेम करतात. ‘दुर्गा झाली गौरी’ पासून सुरू झालेला सुकन्या मोनेंचा प्रवास आजही मराठीसह हिंदीत जोमाने सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला आणि ब्लॉकबस्टर ठरलेला ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील त्यांनी साकारलेली साधना काकडे ही प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. त्यानंतर आता त्या लवकरच नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. नुकतच सुकन्या मोने पती, अभिनेते संजय मोने यांच्यासह ‘लोकमत फिल्मी’च्या ‘लव्ह गेम लोचा’ या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी लग्नानंतर सासू सासऱ्यांकडून मिळालेल्या प्रेमाविषयी सांगितलं.

हेही वाचा – “समारंभपूर्वक लग्न करणं हा माझ्या मते गुन्हा”; संजय मोने यांचं वक्तव्य, म्हणाले…

सुकन्या मोने म्हणाल्या, “मला माझे सासू सासरे परत आमच्या संसारात आले तर फार आवडेल. जर आमच्या आयुष्यात सासरे असते तर आमचं आयुष्य वेगळं झालं असतं. खूप काहीतरी वेगळं घडलं असतं. माझ्या ज्युलियाला छान आजोबा मिळाले असते. माझ्या सासू-सासऱ्यांनी मला कधीच मुलीसारखं मानलं नाही. तर मुलगीच म्हणून त्यांनी वागणूक दिली. खरंतर त्यांना सुद्धा दोन मुली आहेत. म्हणजेच मला दोन नणंदा आहेत. पण त्यांनी मुली असून सुद्धा माझं खूप कौतुक केलं. माझं लग्न झाल्यानंतर जेव्हा माझा पहिला वाढदिवस मोने कुटुंबात झाला. तेव्हा सासूबाईंनी गुपचूप मला सरप्राइज द्यायचं म्हणून त्यांनी रात्री जागून माझ्यासाठी ओल्या नारळाच्या करंज्या केल्या होत्या. हे मी आयुष्यात कधीच विसरू शकतं नाही.”

हेही वाचा – पहिल्यांदा बालकलाकार अर्जुनच्या कॅन्सरग्रस्त आजीला दाखवला होता ‘एकदा काय झालं’ चित्रपट , ‘तो’ प्रसंग सांगत सलील कुलकर्णी म्हणाले…

पुढे सुकन्या मोने म्हणाल्या, “जेव्हा लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा मला ‘सरकारनामा’साठी फिल्मफेअर मिळालं. तेव्हा मी त्यांना विचारलं की, तुम्ही माझ्याबरोबर यायला का? ते म्हणाल्या, हो येणार ना. त्यावेळेला माझे सासरे थ्री पीस सूट घालून माझ्या सासूबाई छान शालू नेसून, लांब केसांचा आंबटा बांधून, घरातल्या गुलाबाच्या झाडावरचा गुलाब केसात घालून अशी तयारी करून दोघंही माझ्याबरोबर फिल्मफेअर अवॉर्ड घ्यायला आले होते. इतकं सुनेचं कौतुक कोण करतं? हे निस्वार्थ प्रेम होतं. माझ्या सासूबाईंनी सांगितलं होतं, जोपर्यंत मी घरात उभी आहे, तोपर्यंत कितीही काम कर, तू घराची काळजी करू नकोस मी आहे. आम्ही जेव्हा प्रयोग करून किंवा शूटिंग करून घरी जायचो, तेव्हा आमचं अंथरुणही घातलेलं असायचं. आमच्या दोघांचे नाइट ड्रेस ठेवलेले असायचे. एवढं कोण करतं.”

हेही वाचा – ‘सैराट’मधल्या बाळ्याची ‘ती’ जिवालिया कोण आहे? अभिनेता तिच्याविषयी सांगताना म्हणाला, “आमच्यामधलं इतकं रिलेशन भारी….”

दरम्यान, सुकन्या मोने यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटानंतर त्या ‘इंद्रधनुष्य’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटात सुकन्या यांच्यासह अभिनेता स्वप्नील जोशी, सागर कारंडे, प्रार्थना बेहेरे, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, नम्रता गायकवाड, नेहा खान, श्वेता पाटील अशी जबरदस्त कलाकार मंडळी दिसणार आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sukanya mone mother in law gave a special surprise on her first birthday after marriage pps
Show comments