मराठी सिनेसृष्टीतील आदर्श आणि लोकप्रिय जोडी म्हणजे संजय मोने आणि सुकन्या मोने. गेली कित्येक वर्ष हे दोघं विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये काम करून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमच स्थान निर्माण केलं आहे. असं हे लोकप्रिय जोडपं नुकतंच ‘लोकमत फिल्मी’च्या ‘लव्ह गेम लोचा’ या कार्यक्रमात सहभागी झालं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – प्रकाश राज यांनी कंगना रणौतची उडवली खिल्ली; अभिनेत्रीचा ‘तो’ व्हिडीओ रिट्वीट करत म्हणाले…

या कार्यक्रमात सुकन्या मोने आणि संजय मोने यांनी प्रेम प्रकरण कसं सुरू झालं? मग घराच्यांना कशाप्रकारे सांगितलं? त्यानंतर संसार कसा केला? असं सर्वकाही सांगितलं. यावेळी त्यांना लग्नानंतर दोघांमधील झालेल्या बदलाविषयी विचारलं. तेव्हा संजय मोनेंनी सुकन्या यांच्यात काहीही बदल झाले नाही, असं सांगितलं. पण सुकन्या यांनी संजय मोने यांच्यात झालेले दोन मोठे बदल सांगितले.

हेही वाचा – “आजकाल कोकणी संस्कृती दाखवण्यापेक्षा माज अन्…”, ‘कोकण हार्टेड गर्ल’वर ‘त्या’ व्हिडीओमुळे टीकेचा भडीमार

सुकन्या मोने म्हणाले, “मी त्याला सतत म्हणते की, मला तो संजय मोने आवडायचा. लांब, कुरळ्या केसांचा, कानात घालणारा, दुप्पटे घेणारा. आता तू असं का नाही करतं. हा मात्र लग्नानंतर त्याच्यात खूप मोठा बदल झाला. हळूहळू त्याने पूर्वीप्रमाणे तसं राहणं बंदच केलं.”

हेही वाचा – …म्हणून भरत जाधव यांना आहे गाड्यांची हौस; वडिलांनी व्हॅनिटी व्हॅन पाहिली होती तेव्हा…

पुढे सुकन्या म्हणाल्या, “आणखी एक त्याचा त्यानेच बदल केला आहे. कुणी सांगून केलेला नाही. लग्नाच्या अगोदर घराकडे तो अजिबात लक्ष द्यायचा नाही. अर्थात आई-वडील होते. वडील समर्थ होते. म्हणून त्याला वाटलं नसेल. पण लग्नानंतर त्याने ज्या पद्धतीने संसाराची जबाबदारी घेतली. ते फार वेगळं आहे.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sukanya mone talk about changes between sanjay mone after marriage pps