मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजेच मृण्मयी देशपांडे. मालिका, सिनेमा, नाटक अशा तिन्ही माध्यमांमधून आपल्या उत्कृष्ट अभिनयानं तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली. नुकताच मृण्मयीचा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशन्ससाठी मृण्मयीनं अनेक ठिकाणी भेट दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा मृण्मयीला तिच्या अशा एका अनुभवाबद्दल विचारण्यात आलं की, जो ती कायमचा जपून ठेवेल किंवा तो तिच्या कायम लक्षात राहील, तेव्हा मृण्मयी म्हणाली, “कुंकू मालिकेचं आमचं शूटिंग सुरू होतं आणि कुठला तरी एक सीन सुरू होता. मास्टर सीन शूट झाला. मग सुनीलदादाचा क्लोज सीन झाला आणि माझ्या क्लोज सीनचं शूटिंग सुरू होतं. त्या सीनमध्ये काहीतरी बोलता बोलता जानकीच्या डोळ्यांत पाणी येतं आणि मी वाक्य बोलले, तर बोलतानाच मला सुनीलदादाच्या चेहऱ्यावरचे भाव मला दिसत होते. तेव्हा तो त्याच्या नरसिंहच्या भूमिकेत नव्हताच जणू. दोन मिनिटांसाठी तो माझ्याकडे खूप कौतुकानं बघत होता.”

मृण्मयी पुढे म्हणाली, “सीन कट झाला आणि काही न बोलता तो माझा हात पकडून मला मेकअप रूममध्ये घेऊन गेला. मी त्याला म्हटलं की, दादा काय झालं? कारण- मला काहीच कळत नव्हतं. तो सगळ्यांसमोर काही न बोलता मला आतमध्ये घेऊन गेला. त्यानं त्याचं पाकीट उघडलं. त्या दिवशी त्याच्याकडे जेवढे पैसे होते ते सगळे त्यानं माझ्या हातावर ठेवले. तुझं कौतुक करायला माझ्याकडे आता वेगळे शब्द नाहीत. माझ्याकडे जर आता दोन कोटी रुपये असते, तर तेही मी तुला दिले असते. मला तुझ्या कामाचं खरंच खूप कौतुक वाटलं, असं तो मला म्हणाला.”

हेही वाचा… ठरलं तर मग: सुभेदार कुटुंबासमोर प्रिया उघड करणार सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य? पाहा प्रोमो

“मी भारावून गेले होते आणि खूप खूश झाले होते. तो माझ्यासाठी एक बेंचमार्क होता. त्याच्यानंतर मी ‘सुखन’चा प्रयोग बघायला गेले होते. ‘सुखन’मधलं ओम भुतकरचं सादरीकरण बघून मी वेडी झाले होते. ‘सुखन’चा प्रयोग झाल्यानंतर मी स्टेजवर गेले, माझ्या पर्समध्ये जेवढे पैसे होते ते मी ओमच्या हातावर ठेवले आणि ओमला म्हणाले, की हे कोणीतरी माझ्याबरोबर केलंय. कोणीतरी माझं असंच कौतुक केलंय,” मृण्मयी पुढे असं म्हणाली.

हेही वाचा… रणबीर कपूरच्या लोकप्रिय चित्रपटातून गोविंदाला काढून टाकलं होतं; अभिनेता झाला होता नाराज

“जेव्हा सुनीलदादाला परफॉर्मन्स बघून खूपच भारी वाटलं असेल तेव्हा त्यानं असं केलं असेल. तशाच प्रकारे त्याचा परफॉर्मन्स बघून मी वेडी झाले होते. तेव्हा माझ्यासाठी आजूबाजूचं सगळं बदलून गेलं होतं. मी कुठल्या तरी वेगळ्या विश्वामध्ये होते. मी जणू तरंगत तरंगत घरी गेले होते. ते तसं मला ओमचा परफॉर्मन्स बघून झालं होतं,” असं मृण्मयीनं नमूद केलं.

हेही वाचा… सलमान खानने ‘या’ अभिनेत्रीला घातली होती लग्नाची मागणी, संजय लीला भन्साळींशी आहे तिचं खास कनेक्शन

दरम्यान, मृण्मयीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर, मृण्मयी देशपांडेनं ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या सिनेमात सुधीर फडके यांच्या पत्नी ललिताबाई फडके यांची भूमिका साकारली आहे. ‘बाबुजीं’ची जीवनगाथा सांगणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट १ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची निर्मिती सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे यांनी केली आहे. मृण्मयी देशपांडेसह सुनील बर्वे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil barve gave all money to mrunmayee deshpande while kunku serial dvr