मराठी नाटक, मालिका व चित्रपट अशा माध्यमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजेच सुप्रिया पाठारे. सुप्रिया पाठारे सध्या ‘नाच गं घुमा’ या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशन्समध्ये व्यग्र आहेत. चित्रपटाच्या प्रमोशन्सदरम्यान त्या अनेक मुलाखतींमध्ये दिसत आहेत. नुकतीच त्यांनी ‘राजश्री मराठी’च्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. अनेक किस्से, चित्रपटातील धमाल-मस्ती, आयुष्यातले अनुभव अशा अनेक गोष्टी त्यांनी या मुलाखतीत शेअर केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुप्रिया पाठारे यांनी या मुलाखतीत वडील आणि त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केलं. एकदा त्यांच्या वडिलांनी त्यांना सिगारेट ओढायला शिकवलं होतं. हा अनुभव शेअर करताना सुप्रिया पाठारे म्हणाल्या, “मी जेव्हा ‘लग्नाची बेडी’ नाटकात काम करीत होते तेव्हा सिगारेट कशी ओढायची हे माझ्या वडिलांनी मला शिकवलं होतं. कारण- मला माहीतच नव्हतं की ती कशी पकडायची, ती ओढायची स्टाईल कशी असली पाहिजे. कारण- मी कधीच सिगारेट ओढली नव्हती. माझे वडिल मला गावच्या देवळाच्या मागे घेऊन गेले आणि तिथे त्यांनी मला सिगारेट ओढायला शिकवलं आणि आईनं तेवढ्यात आम्हाला बघितलं आणि आई वडिलांना म्हणाली की, अहो हे काय त्या कार्टीला शिकवताय. तुम्ही तर बिघडला आहातच; तिलापण बिघवडताय.”

“वडील मुलीला सिगारेट ओढायला शिकवतायत हे बघायला आणि ऐकायला किती भयानक वाटत असेल. माझी आई तर खूप घाबरली होती. ती सतत म्हणायची, अरे देवा, बापच मुलीला सिगारेट ओढायला शिकवतोय. पण, त्यांना माहीत होतं की हे नाटकासाठी आहे आणि त्यानंतर मी कधीच सिगारेट नाही ओढली. म्हणजे मला तसं वाटलंही नाही की, बघूया ना सिगारेट ओढून कसं वाटतंय. मला कोणतंच व्यसन नव्हतं. मला फक्त एकच व्यसन आहे आणि ते म्हणजे खाणं व फिरणं. ही माझी दोन व्यसनं आहेत.”

हेही वाचा… “दोनवेळचं जेवण मिळायचं नाही”, अभिजीत खांडकेकरने सांगितला पहिल्या मालिकेतील ‘तो’ अनुभव, म्हणाला…

हेही वाचा… “आता मी काय करू?”, ‘ठरलं तर मग’फेम अभिनेता पडला गोंधळात; प्रेक्षकांना प्रश्न विचारत म्हणाला…

दरम्यान, सुप्रिया पाठारे यांचा आगामी चित्रपट ‘नाच गं घुमा’ १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासह मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, सारंग साठे, मायरा वायकुळ, शर्मिष्ठा राऊत, मधुगंधा कुलकर्णी, सुनील अभ्यंकर हे कलाकार आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya pathare father taught her cigarette smoking dvr