मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी सचिन पिळगावकर आणि सुप्रिया यांची लेक श्रिया पिळगावकरने बॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण कली आहे. ‘मिरझापूर’, ‘गिल्टी माईंड्स’, ‘द ब्रोकन न्यूज’ अशा वेब सीरिजमध्ये दमदार भूमिका साकारत श्रिया प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. आज (२५ एप्रिल रोजी) श्रिया तिचा ३५ वा वाढदिवस साजरा करतेय. या दिवशी श्रियाच्या आईने म्हणजेच सुप्रिया पिळगावकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुप्रिया पिळगावकर यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर याबद्दल अनेक स्टोरीज शेअर केल्या आहेत. पहिल्या स्टोरीत त्यांनी लिहिलंय, “तू माझ्या मुलीच्या रूपात माझ्या आयुष्यात आलीस, यामुळे मला किती धन्यता वाटते हे व्यक्त करताना मला शब्द अपुरे पडतात.”

हेही वाचा… “….आणि बाबांकडे जावंस वाटतं”, बाबिल खानने इरफान खान यांचा उल्लेख करत शेअर केली भावुक पोस्ट

तर दुसरी स्टोरी शेअर करत त्यांनी लिहिलं, “हाच तो दिवस होता, जेव्हा तू आमच्या आयुष्यात आलीस. तेव्हापासून ते आजपर्यंत तू आयुष्यात कधीच मागे वळून पाहिलं नाहीस. तू तुझ्याबरोबर लक्ष्मी मातेला आमच्या आयुष्यात घेऊन आलीस.”

पुढे अशाच स्टोरीज शेअर करत सुप्रिया पिळगावकर यांनी लेकीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी, सर्व पैलूंमध्ये तुला पुढे जाताना पाहून मला खूप समाधान वाटतं.”

“नेहमीच मला एक चांगली आई असल्याचा मान मिळालाय, पण हे सगळं खरतर तुझ्यामुळे शक्य झालंय. जर मला तुझ्यासारखी आदर्श मुलगी नसती तर मी किती आदर्शवान असती याची मला खात्री नाही.”

“एका किशोरवयीन मुलीचे पालक या नात्याने आमच्यासाठी हा प्रवास खूप वेगळा होता. धन्यवाद. तू जशी आहेस तशीच राहिलीस.”

“आणि आता तू आकाशात उंच भरारी घ्यायला तयार झाली आहेस. आपल्या स्वप्नांच्या दिशेने वेगाने तू झेप घेत आहेस आणि दुसऱ्या बाजूला आमचीही काळजी करत आहेस.”

“तू एक अतिशय सुंदर व्यक्ती आहेस, जी सतत आपल्या भविष्यासाठी कार्यरत असते. जिचा आयुष्यात खूप चांगला हेतू आहे.”

“तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… आनंद वाटून ज्याप्रकारे तुला दिवस घालवायला आवडतो तसाच आजचा दिवस जग.”

एवढ्या सगळ्या स्टोरीज शेअर केल्यानंतर सुप्रिया पिळगावकर यांनी श्रियाच्या बालपणीचा व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, श्रियाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर श्रिया सध्या ‘ब्रोकन न्यूज २’ या आगामी वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ३ मे २०२४ रोजी ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजमध्ये श्रियाबरोबर सोनाली बेंद्रे, जयदीप अहलावत, जय उपाध्याय हे कलाकारदेखील आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya pilgaonkar shared special post on daughter shriya pilgaonkar birthday dvr