‘सिंहासन’ या मराठी चित्रपटाला ४४ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, दिग्दर्शक जब्बार पटेल, अभिनेते नाना पाटेकर, मोहन आगाशे, खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमात सुप्रिया सुळेंना चित्रपटाबद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्यांनी हा चित्रपट वेदना देणारा असल्याचं म्हटलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“शरद पवार ‘सिंहासन’च्या प्रिमियर शोला आले अन्…”, जब्बार पटेलांनी सांगितला ‘तो’ किस्सा; म्हणाले, “पुढील ४४ आठवडे…”

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “सिंहासन’ हा चित्रपट बायोग्राफी नव्हता. समाजात सगळ्या प्रकारचे लोक असतात व बऱ्याच गोष्टी घडत असतात. आपण एक सर्कस म्हणून बघायचं. खरं तर मी जेव्हा जेव्हा हा चित्रपट पाहते, तेव्हा तो मला खूप वेदना देतो. मला तो मनोरंजनात्मक वाटत नाही, तर तो खूप अस्वस्थ करतो. महत्त्वाचं म्हणजे ४४ वर्षांनंतर चित्रपट बघताना जर अंगावर काटा येतो. त्यामुळे हा चित्रपट वेदना देणारा आहे.”

दरम्यान, या चित्रपटाबद्दल उपस्थित सर्वांनी त्यांची मतं मांडली. तसेच चित्रपटाशी संबंधीत शरद पवारांचा किस्सा सांगताना जब्बार पटेल म्हणाले, “मी पहिल्या दिवशी सिनेमागृहात गेलो. चित्रपटगृहाच्या मालकाने मला सिंहासन चित्रपटाचं आठवडाभरासाठी अँडव्हान्स बुकिंग झाल्याचं सांगितलं. पहिल्या शोला कोण येणार असं मी त्याला विचारलं. त्यावर तो उत्तर देत मुख्यमंत्री येणार आहेत, असं म्हणाला. सिंहासनच्या प्रिमियर शोसाठी शरद पवार आले आणि त्यानंतर जवळ जवळ ४४ आठवडे चित्रपट चालला. त्या सिनेमाला काहीही त्रास झाला नाही.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule says sinhasan movie is painful hrc