नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि अभिनित ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळेंनी संपूर्ण टीमसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रमोशन केले. मात्र या चित्रपटातील काही कलाकार नागराज मंजुळेंवर नाराज झाले आहेत. त्यांनी दिलेल्या मुलाखतीदरम्यान याबद्दलचे भाष्य केले आहे.

नागराज मंजुळे यांच्या चित्रपटात काही कलाकार हे कायमच ठरलेले असतात. ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटातही त्यांनी ठराविक कलाकार घेतले आहेत. अभिनेता आकाश ठोसरसह, अरबाज शेख, सुरज पवार, सोमनाथ अवघडे, तानाजी गळगुंडे हे कलाकारही यात झळकणार आहेत. पण आता या कलाकार मंडळींनी नागराज मंजुळेंनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘आटपाट प्रॉडक्शन’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दलचा खुलासा केला आहे.
आणखी वाचा : पहिला प्रपोज ते सेलिब्रिटी क्रश, नागराज मंजुळेंनी केला खुलासा; म्हणाले “आता सांगण्यात…”

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”

या मुलाखतीच्या सुरुवातीला अरबाज शेख, सुरज पवार, सोमनाथ अवघडे, तानाजी गलगुंडे हे कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनबद्दल बोलताना दिसत आहेत. त्यावेळी ते ‘एकमेकांना प्रमोशनसाठी तू का गेला नाही?’ असे विचारताना दिसत आहेत. त्यावर ते त्यांची त्यांची कारण सांगताना दिसत आहे.

“आम्ही नागराज अण्णांवर नाराज आहोत”, असं या व्हिडीओला कॅप्शन देत या कलाकारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. याचे कारण म्हणजे ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटानिमित्त नागराज मंजुळे अनेक ठिकाणी भेटी देत आहेत. पण त्यांनी आम्हाला कुठेच प्रमोशनसाठी नेलं नाही. तुम्ही आम्हाला फक्त या म्हणून सांगा, आम्ही एसटीने तिकिटं काढून तिथे येतो, असेही हे कलाकार गमतीत म्हणताना दिसत आहे.

आणखी वाचा : “पप्पांना तुझा अभिमान वाटेल असं…” भावाच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखची खास पोस्ट, फोटोंनी वेधलं लक्ष

यावेळी तानाजी नागराज मंजुळे यांचं सर्वात जास्त प्रेम कोणावर आहे असा करतो, तेव्हा सगळेजण एकमताने आकाश ठोसरचं नाव घेतात. पण हा गमतीचा भाग सोडला तर अण्णांनी आमच्या सर्वांवरच खूप प्रेम दाखवलेलं आहे. त्यांचा खास असा कोणताच कलाकार नाही. सध्या त्यांनी अनेक नवीन कलाकारांना संधी दिली आहे. आपल्यावरही नागराज अण्णांचं तितकंच प्रेम आहे, असेही हे सर्वजण सांगताना दिसत आहे.

Story img Loader