Swapnil Joshi And Prasad Oak New Movie : येत्या काही दिवसांत मराठी कलाविश्वात नवनवीन धाटणीचे आणि वैविध्यपूर्ण असे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. गरम गरम ‘जिलबी’ची गोड चव काही औरच असते. अशीच एक लज्जतदार ‘जिलबी’ आपल्या भेटीला येणार आहे पण… मराठी चित्रपटाच्या रूपाने. हा चित्रपट पुढच्या वर्षी १७ जानेवारीला प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. या तिघांच्या जोडीला पर्ण पेठे, गणेश यादव, प्रणव रावराणे, अश्विनी चावरे, प्रियांका भट्टाचार्य या कलाकारांनी आपल्या अभिनयाने मनोरंजनाच्या या ‘जिलबी’चा खुसखुशीतपणा वाढवला आहे. या चित्रपटाचं आकर्षक असं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. पोस्टरमधील कलाकारांचा लूक लक्ष वेधून घेणारा आहे. ‘जिलबी’ चित्रपटाचं दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केलं आहे.

हेही वाचा : Video : सूर्या दादाने सहकलाकारांबरोबर केला ‘मेहबूबा’ गाण्यावर डान्स; अभिनेत्रीच्या कमेंटने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “जाळ, धूर…”

‘जिलबी’च्या पहिल्याच पोस्टमध्ये प्रसाद, स्वप्नील आणि शिवानीचा जबरदस्त लूक पाहायला मिळत आहे. आता या तिघांभोवती नेमकं कसलं जाळं पसरलंय याचा उलगडा चित्रपट पाहिल्यावरच होईल. स्वप्नील आणि प्रसाद एकत्र झळकणार असल्याने सध्या प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. तर, यांच्या सोबतीला सध्या मालिकाविश्व गाजवणारी शिवानी सुर्वे प्रमुख भूमिका साकारणार आहे.

मराठी प्रेक्षकांसाठी ‘जिलबी’ हा चित्रपट जबरदस्त मनोरंजनाची ट्रीट असेल असं निर्माते आनंद पंडित सांगतात. गोड आणि गूढ अशी ‘जिलबी’ प्रेक्षकांना नक्की आवडेल आणि तिच्या मनोरंजनाचा चविष्ट आस्वाद प्रेक्षकांच्या मनात घर करेल असा विश्वास दिग्दर्शक नितीन कांबळे व्यक्त केला आहे.

हेही वाचा : “गूड बाय यश अरुंधती देशमुख…”; ‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखने लिहिली भलीमोठी भावुक पोस्ट, म्हणाला, “निरोप घेताना…”

हेही वाचा : आर्यनचं दिग्दर्शनात पदार्पण; कंगना रणौत शाहरुख खानच्या मुलाचं कौतुक करत म्हणाली, “बाहुलीसारखं सजून राहण्यापेक्षा…”

‘जिलबी’ चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांची आहे. तर, छायांकन गणेश उतेकर यांचं आहे. कलादिग्दर्शन कौशल सिंग यांचं असून क्रिएटिव्ह दिग्दर्शन राहुल व्ही. दुबे यांनी केलं आहे. रूपा पंडित आणि राहुल व्ही.दुबे सहनिर्माते असून चित्रपटाचे कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swapnil joshi and prasad oak new film jilabi and this actress in lead role sva 00