परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ चित्रपट चांगलाच गाजला होता. सुरुवातीला या चित्रपटाला प्रेक्षकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. पण नंतर चित्रपटाच कथानक उत्तम असल्यामुळे प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्वप्नील जोशी आणि शिवानी सुर्वे ही जोडी रुपेरी पडद्यावर झळकली. त्यानंतर आता पुन्हा ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार…” ‘रंग माझा वेगळा’ फेम रेश्मा शिंदेची भावुक पोस्ट; म्हणाली, “पुन्हा नव्या रुपात…

या आगामी नव्या मराठी चित्रपटाची घोषणा नुकतीच अभिनेता प्रसाद ओकने केली होती. ‘जिलबी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. ‘वाळवी’नंतर स्वप्नील जोशी आणि शिवानी सुर्वे ही जोडी ‘जिलबी’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यांच्या जोडीला प्रसाद ओक सुद्धा असणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली आहे.

हेही वाचा – “‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकात एन्ट्री होताच प्रेक्षक भुवनेश्वरी, भुवनेश्वरी ओरडू लागले अन्…”; कविता मेढेकर सांगितला किस्सा, म्हणाल्या…

शिवानने इन्स्टाग्रामवर या चित्रपटाच्या क्लॅपबरोबरचा फोटो शेअर केला आहे. “माझा पुढील…” असं लिहीत तिनं हा फोटो शेअर केला आहे. शिवानीची ही पोस्ट पाहून कलाकार मंडळींबरोबर चाहत्यांनी तिचं अभिनंदन करत, शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – अक्षरा आणि अधिपतीच्या साखरपुड्याच्या निमित्तानं प्रशांत दामलेंची ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत होणार एन्ट्री? कविता मेढेकर म्हणाल्या…

हेही वाचा – Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या सेटवर उशीरा कोण येतं? तेजश्री प्रधान म्हणाली, “ठाण्यावरून….”

‘जिलबी’ या आगामी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा नितीन कांबळे सांभाळत आहेत. तसेच आनंद पंडीत यांच्याकडे या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी आहे. ‘जिलबी’ चित्रपटात स्वप्नील जोशी, प्रसाद ओक आणि शिवानी सुर्वे कोणत्या भूमिकेत झळकणार हे येत्या काळात समजेल. पण पहिल्यांदाच हे त्रिकुट एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swapnil joshi and shivani surve will work together once again in the upcoming movie jilbi after vaalvi pps