‘नाच गं घुमा’ या चित्रपटाच्या माध्यमातून निर्मिती विश्वात पदार्पण केल्यानंतर आता महाराष्ट्राचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा चित्रपट येत्या जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता स्वप्नील जोशीसाठी २०२४ हे वर्ष खूपच खास ठरणार आहे कारण, यंदा त्याचे अनेक नाविन्यपूर्ण चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मिती, अभिनय आणि आणखी काही विविधांगी भूमिकांमधून स्वप्नील येणाऱ्या वर्षात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे. ‘नवरा माझा नवसाचा २’, ‘नाच गं घुमा’ या चित्रपटानंतर अभिनेत्याने आता नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या सिनेमाचं नाव ‘बाई गं’ असून येत्या १४ जून २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

हेही वाचा : लोकप्रिय युट्यूबर अभि आहे ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचा लेक, तर नियू आहे सून; दोघांचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते सन्मान

‘बाई गं’मध्ये स्वप्नीलबरोबर मुख्य भूमिका कोण साकारणार हे अद्याप समोर आलेलं नाही. याबद्दल अभिनेता म्हणतो, ‘नाच गं घुमा’नंतर मी लगेच ‘बाई गं’सारखा चित्रपट करणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. लवकरच या चित्रपटात माझी भूमिका काय आहे हे सर्वांसमोर स्पष्ट होईल. २०२४ मध्ये मी खूप काम करतोय आणि तुमचं न थांबता मनोरंजन करता येतंय या सारखं वेगळं सुख काय असणार ना! ‘बाई गं’मध्ये नक्कीच काहीतरी खास असणार आहे परंतु यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट बघावी लागणार आहे. लवकरच या चित्रपटाबद्दल पुढच्या अपडेट्स आम्ही शेअर करू.”

हेही वाचा : Oscar च्या १.४ कोटींच्या ‘गुडी बॅग’ मध्ये नेमकं काय असतं? कोणाला मिळतात या बॅग्स? जाणून घ्या सर्व माहिती

दरम्यान, परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपट येत्या मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते अशी मराठीतील प्रसिद्ध कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swapnil joshi announces new movie bai ga releases in june sva 00