Swapnil Joshi Brand New Defender Car : अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी वर्षाच्या अखेरीस आलिशान डिफेंडर कारचं आगमन झालेलं आहे. आपल्या कुटुंबीयांसह अभिनेत्याने या नवीन गाडीचं स्वागत केलं आहे. स्वप्नीलने नवीकोरी रेंज रोव्हर डिफेंडर गाडी खरेदी केली आहे. कार घेतानाचा छानसा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. याबरोबर अभिनेत्याने आयुष्याला समर्पित असं एक छान पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

स्वप्नील जोशीची खास पोस्ट

लँड रोव्हर रेंज रोव्हर
डिफेंडर

Akali Leader Sukhbir Singh Badal Attacked at Goldan Temple
Sukhbir Singh Badal Firing : सुवर्ण मंदिराबाहेर सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार! घटनेचा थरारक Video आला समोर
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
Girgaon Marathi Marwari Conflict
“इथे मराठीत न बोलता..”, गिरगावमध्ये मराठी भाषेच्या गळचेपीवर भाजपा आमदार मंगल प्रभात लोढांची मोठी प्रतिक्रिया
Devendra Fadnavis and Eknath Shinde
Maharashtra Government Formation: देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; आता उपमुख्यमंत्रीपद…
chunky pandey was called to attend funeral
पैसे देऊन अंत्यसंस्काराला बोलावलं, रडल्यास मानधन वाढवून देण्याची कुटुंबाची ऑफर अन्…; बॉलीवूड अभिनेत्याचा खुलासा
Eknath Shinde Amit Shah Meeting
“किमान सहा महिने तरी मुख्यमंत्रीपद द्या”, एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे मागणी; दिल्लीत काय चर्चा झाली?

डिअर जिंदगी!

आजचा दिवस माझ्यासाठी आणि माझ्या प्रियजनांसाठी खूपच खास आहे. माझ्या आयुष्याच्या प्रवासातील हा सर्वात मोठा अभिमानास्पद क्षण आहे.

माझ्या बाबांच्या हातात नव्या डिफेंडर गाडीच्या चाव्या पाहून खरंच मन भरून आलं. आपण आयुष्यात खरंच खूप पुढे आलोय… मी हे सगळं मिळवू शकेन की, नाही याबाबत अनेकांच्या मनात आधी शंका होती. पण, हे सगळं माझ्या कुटुंबीयाच्या साथीने शक्य झालं. माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी, ती स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आई-बाबांनी मला आत्मविश्वास दिला.

ही डिफेंडर फक्त कार नाहीये. हे मी आजवर केलेल्या कामाचं प्रतीक आहे. माझ्या आई-बाबांच्या मेहनतीचं फळ आहे. आयुष्यात काहीच कठीण नाही. तुम्ही फक्त प्रयत्न केले पाहिजेत हे ही गाडी कायम दर्शवेल. तुमचं पॅशन, इच्छाशक्ती आणि प्रियजनांच्या साथीने तुम्ही कोणतीही गोष्टी ‘डिफेंड’र करू शकता.

डिअर जिंदगी, ही फक्त एक सुरुवात आहे. या प्रवासात आणखी अनेक चढउतार पाहायचे आहेत. आयुष्यात आणखी खूप गोष्टी करायच्या आहेत. आता येणारा प्रत्येक दिवस मला काही ना काही नवीन शिकवून माझ्या एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करत आहे. This is our moment to shine Congratulations dear Zindagi !!!!!

हेही वाचा : तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’ची नवी मालिका ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, समोर आली संपूर्ण स्टारकास्ट

हेही वाचा : नागा चैतन्य-सोभिता धुलीपाला ६५० कोटींच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये करणार लग्न, सुपरस्टार्स लावणार कुटुंबासह खास हजेरी, गेस्ट लिस्ट आली समोर

स्वप्नील जोशीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांसह मराठी कलाविश्वातील कलाकारांनी प्रतिक्रिया देत अभिनेत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिजीत खांडकेकर, मीरा जगन्नाथ, संग्राम चौगुले, धैर्य घोलप या कलाकारांनी स्वप्नीलच्या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान, स्वप्नीलच्या ( Swapnil Joshi ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर नुकताच तो ‘नवरा माझा नवसाचा २’ या सुपरहिट चित्रपटात झळकला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्याचं पाहायला मिळालं. आता लवकरच स्वप्नील ‘जिलबी’ चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट येत्या जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader