आपल्या दमदार अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यावर आता स्वप्नील जोशी निर्माता म्हणून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. ‘नाच गं घुमा’च्या निमित्ताने त्याचा निर्मिती क्षेत्रातील प्रवास सुरू होणार आहे. यापूर्वी देखील त्याने काही कलाकृतींची सहनिर्मिती केली आहे. उत्तम अभिनयाप्रमाणेच स्वप्नील जोशी अनेक सामाजिक विषयांवर आपलं स्पष्ट मांडताना दिसतो. गेल्या महिन्यात निवडणुकांचं बिगुल वाजल्यावर कोणते सेलिब्रिटी यंदा रिंगणात उतरणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. याबाबत नुकत्याच महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने आपलं मत मांडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वप्नील जोशीला राजकीय पक्षांचा प्रचार करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला यावर अभिनेता म्हणाला, “सर्वच राजकीय पक्ष माझे मित्र आहेत. मी कोणासाठीही प्रचार करत नाही. व्यावसायिक भाषेत याला सुपारी म्हटलं जातं. असे पैसे घेऊन विशिष्ट ठिकाणी जायचं या गोष्टी मी करत नाही. अनेक सामाजिक किंवा सरकारी उपक्रमांमध्ये मी स्वेच्छेने सहभागी होतो. तेव्हा अजिबात पैसे घेत नाही.”

हेही वाचा : सयाजी शिंदे यांच्यावर साताऱ्यात झाली अँजिओप्लास्टी; प्रकृतीबाबत डॉक्टर माहिती देत म्हणाले…

“सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होणं ही कलाकार म्हणून माझी जबाबदारी आहे. प्रचार करणं किंवा न करणं हे अत्यंत वैयक्तिक किंवा व्यक्तीसापेक्ष आहे. शेवटी मी या देशाचा नागरिक आहे आणि माझी सुद्धा काही मतं आहेत. आपल्याला एकाचं पटतंय आणि आपण पैसे घेऊन दुसऱ्याचा प्रचार करायचा हे मला पटणार नाही. यानिमित्ताने मी सर्वांना आवाहन करतो की, आपण सर्वांनी न चुकता मतदान केलं पाहिजे. ती एक जबाबदारी आहे. कोणत्याही पक्षाला मत द्या, पण मतदान करा” असं आवाहन स्वप्नील जोशीने केलं आहे.

हेही वाचा : Video : ‘देवदास’मधील गाण्यावर माधुरी दीक्षितच्या दिलखेचक अदा, सुंदर हावभाव पाहून नेटकरी भारावले

दरम्यान, स्वप्नील जोशी आता लवकरच ‘बाई गं’, ‘नवरा माझा नवसाचा २’, ‘जिलबी’ या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय ‘नाच गं घुमा’बद्दल सांगायचं झालं, तर हा चित्रपट १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची निर्मिती परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी, स्वप्नील जोशी, तृप्ती पाटील, शर्मिष्ठा राऊत व तिचा पती तेजस देसाई यांनी केली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swapnil joshi reaction on campaign for political party in election 2024 sva 00
Show comments