मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत नावाजलेला अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी. वयाच्या नवव्या वर्षांपासून स्वप्नील अभिनय क्षेत्रात अविरत काम करत आहेत. आजवर त्याने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. येत्या काळातही स्वप्नील हटके भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहे. अशा या लोकप्रिय आणि चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वप्नील जोशीच्या आईचा आज ७४वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अभिनेत्याने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेता स्वप्नील जोशीने आईच्या वाढदिवसानिमित्ताने एक खास व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो आईविषयी सांगताना दिसत आहे. स्वप्नील म्हणतो, “आम्ही मम्माज बॉय आहे. हे संपूर्ण जगात केलं जात. आई ही माझी बेस्ट फ्रेंड आहे. मला एखादी मुलगी आवडली तर मी तिला हक्काने जाऊन सांगायचो. आई बसना आज काय झालं माहितीये…आई एकदम बंटा है होती. अजूनही ती बंटा है आहे. आई हे असं एकमेव नातं आहे जे फोनवरच्या हॅलोने पण सांगतं काय रे, काय झालं? या व्हिडीओनंतर स्वप्नीलच्या आईचे सुंदर फोटो पाहायला मिळत आहेत.
स्वप्नीलने हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, आई ७४व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…तुझ्या शहाणपणाने, काळजीने आणि प्रेमाने या प्रवासाला आकार दिला. माझं आयुष्य म्हणण्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. मला या जगात आणल्याबद्दल आणि आमचे सर्व जीवन आनंदमय केल्याबद्दल धन्यवाद. तुझा दिवस उत्तम आरोग्य, अमर्याद आनंदाने आणि तू उदारपणे इतरांसोबत वाटून घेतलेले प्रेम आणि कुटुंबासाठी एक सुंदर घर बनवलेलं जावो, हे असे अनेक सुंदर क्षण एकत्र आहेत…तुझ्या अतुलनीय प्रवासासाठी शुभेच्छा…खूप सारं प्रेम.
हेही वाचा – ‘या’ दोन लोकप्रिय मराठी मालिका लवकरच होणार बंद; एक तर पाच महिन्यांपूर्वीच झालेली सुरू
दरम्यान, स्वप्नील जोशीच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याचा ‘जिलबी’ नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात त्याच्या सोबतीला प्रसाद ओक आणि शिवानी सुर्वे पाहायला मिळणार आहे. याच चित्रपटात स्वप्नील विजय करमरकर या डॅशिंग पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं दमदार मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं. आनंद पंडित मोशन पिक्चर्स निर्मित ही खुमासदार ‘जिलबी’ १७ जानेवारीपासून आपल्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केलं आहे.
© IE Online Media Services (P) Ltd