अभिनेता स्वप्नील जोशी हा सतत चर्चेत राहणारा अभिनेता आहे. तो नुकताच ‘बाई गं’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात साकारलेल्या विविध भूमिकांची मोठी चर्चा रंगलेली दिसली होती. आता त्याने एका मुलाखतीदरम्यान, मी जेव्हा काम करतो त्यावेळी माझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये एक गोष्ट अनिवार्य असते, असे सांगितले आहे.

काय म्हणाला स्वप्नील जोशी?

स्वप्नील जोशीने ‘व्हायफळ’ या यूट्यूब पॉडकास्टला नुकतीच मुलाखत दिली, त्यावेळी त्याने अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला आहे. त्याने त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. सकाळी लवकर उठायला आवडते की नाही? या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेत्याने म्हटले आहे, “स्वाभाविकपणे मला लवकर उठायला आवडत नाही. मला जर कोणी झोपेतून उठवलं नाही, तर मी उठणारच नाही, असं माझी आई म्हणते. तीन दिवस मी सलग झोपतो. उठतो, जेवतो मग परत झोपतो. कारण माझी चिरंतन झोप अपूर्ण आहे. गेल्या अनेक वर्षांची झोप अपूर्ण आहे. कारण मी वयाच्या नवव्या वर्षी काम करायला सुरुवात केलीय, माझी अनेक वर्षांची झोप अपूर्ण आहे आणि मला झोप अत्यंत प्रिय आहे. एखाद्या गोष्टीला सामोरं जाण्यासाठी मला झोप मदत करते. मला कोणत्या गोष्टीचा तणाव असेल, दबाव असेल, काम नसेल, खूप काम केलं, पैसे खूप आले किंवा पैसे नसले तरी मी झोपतो.”

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises to mother in law
“माझी सासू माझा एक पाय…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सासूबाईचं केलं कौतुक; म्हणाली, “माझ्या रुद्राजची ती यशोदा…”
Amiatbh Bachchan And Rekha
रेखा यांनी सांगितला अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘सुहाग’ या चित्रपटात काम करण्याचा अनुभव, म्हणाल्या, “ज्यांच्याबरोबर मी…”

हेही वाचा: Kalki 2898 AD बॉक्स ऑफिस गाजवल्यावर OTT वर होणार प्रदर्शित; कुठे पाहता येणार अमिताभ बच्चन, प्रभासचा सिनेमा?

पुढे बोलताना स्वप्नील म्हणतो, “देवाची कृपा आहे, मी माझ्या आयुष्यात करिअरच्या अशा ठिकाणी आहे, जिथे मी काम करतो तिथे कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेलं असतं की, जेवणाच्या सुट्टीनंतर एक तास अनिवार्य झोपेसाठी सुट्टी असते, हे लिखित असतं. लोकांचा लंच ब्रेक एक तासाचा, माझा दोन तासांचा असतो. जेवल्यानंतर मी एक तास काम करत नाही.” झोपेचे महत्त्व सांगताना अभिनेत्याने म्हटले आहे की, एक तास कोणी झोपत नाही, पण २०-२५ मिनिटांची जी डुलकी असते, त्यामुळे पुढचे आठ तास काम करण्यासाठी तुम्ही तयार होत असता. मी जर चुकत नसेन तर जपानमध्ये मुलांना २० मिनिटांच्या सुट्टीमध्ये झोपायला देतात.

अभिनेत्याने पुढे म्हटले आहे की, मला देवाच्या कृपेने झोप लागते. मला वाटतं, जर तुम्हाला भूक लागत असेल, खाल्लेल्या अन्नाचे पचन होत असेल आणि तुम्हाला झोप लागत असेल, यासारखी मोठी गोष्ट नाही. तुमच्याकडे करोडो-अब्जो रुपये असतील, पण भूक लागत नसेल, खाल्लेल्या अन्नाचं पचन होत नसेल आणि तुम्हाला झोप येत नसेल तर इतके पैसे असून त्याचा काय उपयोग आहे. त्यामुळे तीन गोष्टी व्यवस्थित असतील तर देवाचा तुमच्यावर आशीर्वाद आहे.

दरम्यान, स्वप्नील जोशी लवकरच ‘नवरा माझा नवसाचा २’ या बहुप्रतिक्षित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची मोठी चर्चा होताना दिसत आहे. अत्यंत लोकप्रिय चित्रपटांपैकी एक असलेला ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे.

Story img Loader