स्वरगंधर्व सुधीर फडके… मराठी घराघरांत आणि मनामनात पोहोचलेलं एक अजरामर नाव. मराठीसह हिंदी गायक, संगीतकार म्हणून त्यांनी संगीतप्रेमींच्या मनात एक ठसा उमटवला. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायकीने आणि संगीताने प्रेक्षकांना भुरळ घातली. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यानिमित्ताने चित्रपटातील कलाकारांशी मारलेल्या दिलखुलास गप्पा…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Video : महेश मांजरेकरांना १० वर्षांपूर्वीच सुचलेलं ‘जुनं फर्निचर’ चित्रपटाचं कथानक, सांगितला भावुक किस्सा

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाच्या निमित्ताने बाबुजी आणि त्यांच्याबरोबर काम केलेल्या अनेक नामवंताची असंख्य गाणी व त्यांचा खडतर जीवनप्रवास उलगडणार आहे. या चित्रपटात एकूण २७ गाणी असून या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना एक अनोखा संगीत नजराणा मिळणार आहे. चित्रपटाची निर्मिती सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे यांनी केली आहे.

याशिवाय सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट योगेश देशपांडे यांनी दिग्दर्शित केला असून चित्रपटाची कथा, पटकथा, संवादही त्यांचेच आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swargandharva sudhir phadke biopic will release on 1st of may maharashtra diwas sva 00