मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक सुव्रत जोशी आहे. त्यानं मराठीबरोबर हिंदी मनोरंजनसृष्टीत आपल्या दमदार अभिनयानं एक वेगळीच छाप उमटवली आहे. सध्या तो ‘ताली’ या वेब सीरिजमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या वेब सीरिजमधील सुव्रतच्या अभिनयाचं खूप कौतुक केलं आहे. त्यानं सुश्मिता सेनबरोबर ट्रान्सजेंडरची भूमिका निभावली आहे. अशा या हरहुन्नरी अभिनेत्यानं नुकताच किडे खातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे; जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओत, सुव्रत नाकतोडे, रेशीमकिडे, रातकिडे खाताना दिसत आहे. हा किडे खातानाचा व्हिडिओ शेअर करत त्यानं लिहील आहे की, “हा जेवणाचा व्हिडिओ जेवताना बघू नये. किड्यामुंगीसारखे जगण्यापेक्षा कधीतरी त्यांना खाऊन बघावे म्हटलं. खाताना आधी हातापायाला मुंग्या आल्या आणि नंतर डोक्यात भुंगा. किडे खाऊन मी माती खाल्ली का?”
हेही वाचा – ‘मास्टरशेफ इंडिया’च्या आगामी सीझनमध्ये मोठा बदल; नव्या परीक्षकाची होणार एन्ट्री
सुव्रतच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवाय कलाकार मंडळींनीही प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेता आशय कुलकर्णीनं प्रतिक्रियेत लिहील की, “छान चाललाय श्रावण.” यावर सुव्रत म्हणाला की, “आजच्या अनुभवानंतर आयुष्यभर पाळीन म्हणतोय.” पुढच्या प्रतिक्रियेत आशयनं लिहील की, “मी असं ऐकलंय तिथे पालीची कोशिंबीर अप्रतिम मिळते.” त्यावर सुव्रत म्हणाला की, “तुझ्यासाठी पार्सल घेतली आहे.” त्यानंतर आशयनं लिहील की, “वाह! अधिकमास तेवढाच.”
हेही वाचा – “स्मृतिभ्रंश हा एक असा आजार…” सीमा देव यांच्या निधनानंतर सूनेची भावुक पोस्ट, म्हणाल्या, “माझ्या सासूबाई…”
सुव्रतच्या या व्हिडीओ एका नेटकऱ्यानं लिहील आहे की, “खरं सांग रील शूट करून घशात बोटं घालून उलट्या केल्यास ना.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहील आहे की, “इतकं श्रीमंत व्हा की परदेशात जाऊन किडेमुंग्या खाता येतील.”