मराठी कलाविश्वातील सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, वैभव तत्त्ववादी, सुव्रत जोशी अशा अनेक कलाकारांनी मराठीसह बॉलीवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी छाप पाडली आहे. मराठी कलाकारांप्रमाणे दिग्दर्शक रवी जाधव यांनी देखील हिंदी कलाविश्वात नाव कमावले आहे. त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ताली’ सीरिजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

हेही वाचा : “आली रे आली”, ‘सिंघम अगेन’मधील दीपिका पदुकोणचा रावडी लूक पाहून रणवीर सिंह भारावला, बायकोचं ‘असं’ केलं कौतुक

Sam Konstas Fan Crashes His Car While Trying to Take with Australian Opener Video Goes Vira
VIDEO: सॅम कॉन्स्टासला भेटण्यासाठी चाहत्याने केली घोडचूक, चालत्या गाडीतूनच उतरला अन्…
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Joe Biden Farewell Speech
Joe Biden Farewell Speech : अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बायडेन यांचा निरोपाच्या भाषणातून धोक्याचा इशारा, देशातील अतिश्रीमंतांवर केली टीका
Renault Triber Discount On 63,000 Rupees In January 2025 Check Specification & Features Details
नवीन कार घेण्याचा विचार करताय? या ७ सीटर कारवर मिळत आहे मोठी सूट; आत्ताच खरेदी केल्यास होईल ६३,००० रुपयापर्यंतचा फायदा
bhaskar jadhav and uday samant
Uday Samant : “शिवसेनेची काँग्रेस झालीय”, भास्कर जाधवांच्या विधानावर उदय सामंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मोठ्या नेतृत्त्वाचं…”
madhuri dixit car Ferrari 296 GTB price
Video: माधुरी दीक्षितने घेतली आलिशान गाडी, किंमत वाचून थक्क व्हाल
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा
How should a driver board an ST bus the driver demonstrated Lalpari new video goes viral netizens mock it
चालकाने एसटी बसमध्ये कसे चढावे? पुन्हा एकदा चालकाने दाखवलं प्रात्यक्षिक; लालपरी’चा नवा Video Viral, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

दिग्दर्शक रवी जाधव सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांच्या दैनंदिन आणि व्यावसायिक जीवनाची प्रत्येक अपडेट ते इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. नुकतीच दिग्दर्शकाने नवीकोरी गाडी खरेदी केली आहे. नवी आलिशान गाडी खरेदी करतानाचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : प्रार्थना बेहेरे झाली उद्योजिका, नणंदेच्या साथीने सुरू केला नवीन व्यवसाय, ब्रॅन्डचं नाव ठेवलंय खूपच खास

रवी जाधव यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्या पत्नी मेघना जाधव देखील पाहायला मिळत आहेत. “आमच्या कुटुंबात नवीन आलिशान इकोफ्रेंडली गाडी दाखल झाली आहे” असं कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिलं आहे. रवी जाधव सपत्नीक या व्हिडीओमध्ये नव्या गाडीचं ओपनिंग करत आहेत.

हेही वाचा : Video : अक्षराला घेऊन अधिपती चढणार जेजुरीचा गड, सुरू होणार मास्तरीण बाईंचा संसार, पाहा नवा प्रोमो

रवी जाधव यांनी खरेदी केलेली गाडी पांढऱ्या रंगाची असून या कारचं नाव टोयोटा हायक्रॉस ZX(O) असं आहे. दिग्दर्शकाने गाडीचं नाव कॅप्शनमध्ये नमूद केलं आहे. या गाडीची ऑनलाइन किंमत ३० लाख अधिक टॅक्स म्हणजेच जवळपास ३५ लाख २८ हजारांच्या घरात आहे. दरम्यान, रवी जाधव यांनी नवीन गाडी घेतल्याने नेटकऱ्यांनी जाधव कुटुंबीयांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Story img Loader