अलीकडे बरेच मराठी कलाकार हिंदी कलाविश्वात आपला ठसा उमटवत असल्याचं पाहायला मिळत आहे. सई ताम्हणकर, प्रिया बापट, वैभव तत्त्ववादी, सुव्रत जोशी, महेश मांजरेकर, सई मांजरेकर, अमृता खानविलकर, सचिन खेडेकर या सगळ्या कलाकारांनी गेल्या काही वर्षांमध्ये प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता लवकरच ‘टाईमपास’ चित्रपटातून घराघरांत लोकप्रिय झालेला प्रथमेश परब एका नवीन सीरिजमध्ये झळकणार आहे.

भुवन बाम आणि श्रिया पिळगांवकर यांची प्रमुख भूमिका असलेली ‘ताजा खबर’ ही सीरिज गेल्यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता लवकरच या सीरिजचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अभिनेता प्रथमेश परब महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. ‘ताजा खबर २’च्या पहिल्याच टीझरमध्ये प्रेक्षकांना प्रथमेशची झलक पाहायला मिळाली.

हेही वाचा : ‘ये है मोहब्बतें’ फेम दिव्यांका त्रिपाठीचा अपघात, हाताचे हाड मोडले, पतीने शेअर केला फोटो

प्रथमेशने नुकताच ‘ताजा खबर २’च्या व्रॅपअप पार्टीत केलेल्या लूकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावर चक्क भुवनने कमेंट करत प्रथमेशच्या बायकोलाही टॅग केलं आहे. अभिनेत्याने नेमकी काय कमेंट केलीये जाणून घेऊयात…

भुवन बाम म्हणतो, “माझा भाऊ कसला भारी दिसतोय…क्षितिजा घोसाळकर तुझा नवरा खूप हॉट आहे.” यावर क्षितिजाने “हो मी तुझ्याशी सहमत आहे” असं उत्तर दिलं आहे. तर “अरे भाई…” अशी कमेंट प्रथमेशने केली आहे.

हेही वाचा : लाडक्या मैत्रिणीचा चित्रपट पाहून अमृता खानविलकर झाली भावुक! सोनाली खरे अन् सनायासाठी लिहिली खास पोस्ट

bhuvan bam
भुवन बामची कमेंट

सध्या प्रथमेशच्या व्हिडीओवर भुवनने केलेली कमेंट सर्वत्र चर्चेत आली आहे. याशिवाय नेटकऱ्यांनी देखील ‘ताजा खबर २’साठी प्रथमेशला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. लग्नानंतर अभिनेता पुन्हा एकदा कामात व्यग्र झाल्याचं पाहायला मिळत आहे.