ओम राऊत दिग्दर्शित ‘तान्हाजी- द अनसंग वॉरिअर’ चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले होते. तसेच दुसऱ्याबाजूला या चित्रपटात मराठी कलाकारांची फौज होतील. यातील एका मराठमोळ्या अभिनेत्याच्या अभिनयाची चांगलीच चर्चा झाली होती. हा अभिनेता म्हणजे कैलास वाघमारे. कैलासने ‘तान्हाजी- द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात ‘चुलत्या’ ही भूमिका साकारली होती. ही भूमिका छोटी असली तरी चांगलीच गाजली होती. अलीकडेच त्याला “घोडा” चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला आर्यन्स सन्मान पुरस्कार मिळाला. असा सर्वोकृष्ट अभिनेता कैलास अलीकडेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरी पत्नी आणि लेकीसह गेला होता.
हेही वाचा – “तुम्ही आता जागे झालात का?” ‘ताली’वरील ‘त्या’ ट्रोल कमेंटवर सुव्रत जोशी स्पष्टच बोलला; म्हणाला, “परदेशात…”
कैलासची पत्नी ही मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘सुख म्हणजे नक्की असतं’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली ‘देवकी’ म्हणजे अभिनेत्री मीनाक्षी राठोड ही कैलासची पत्नी आहे. सध्या ती ‘अबोली’ या मालिकेत ‘नीता’च्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. कैलास आणि मीनाक्षी या दोघांना एक छोटीस गोंडस मुलगी देखील आहे. नेहमी दोघं मुलीबरोबरचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
नुकतंच हे सहकुटुंब केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरी पाहुणचारासाठी पोहोचलं होतं. याचा व्हिडीओ मीनाक्षीनं तिच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कैलास आपल्या कुटुंबाला घेऊन गावी गेल्याचं पाहायला मिळतं आहे. यावेळी कैलास आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवताना दिसत आहे. तसेच मीनाक्षी बरोबरच्या जुन्या आठवणी देखील सांगत आहे.
हेही वाचा – ‘दादा कोंडके, कृष्णाष्टमी आणि जीवनमरणाच्या हिंदोळ्यावर’
याचवेळी कैलासला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरी सहकुटुंब पाहुणचाराला बोलावलं होतं. त्यानिमित्तानं दोघं लेकीसह त्यांच्या घरी गेले होते. रावसाहेब दानवे यांच्या पत्नी निर्मलाताई यांनी कैलासच्या कुटुंबाच स्वागत केलं. यावेळी कैलास आणि मीनाक्षीला भेटवस्तू दिल्या. तसेच खास त्यांच्या चिमुकल्या गोंडस मुलीसाठी सोन्याची अंगठी, कानातले, कपडे असं बरचं काही दिलं.
दरम्यान, कैलास आणि मीनाक्षीला १० मे २०२२ रोजी कन्यारत्न प्राप्त झालं. त्यानंतर चार महिन्यांनी दोघांनी त्यांच्या बाळाचे नाव ठेवलं. ‘यारा’ असं त्यांच्या लेकीचं नाव आहे.