अभिनेत्री तेजश्री प्रधान(Tejashri Pradhan) ही ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ या तिच्या नवीन चित्रपटामुळे मोठ्या चर्चेत आहे. या चित्रपटात तिने लोकप्रिय अभिनेते सुबोध भावेंबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्ताने अभिनेत्रीने मुलाखती दिल्या असून, तिच्या वक्तव्याची सध्या चर्चा होताना दिसत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तेजश्रीने सध्याच्या पिढीला एक सल्ला दिला आहे. बेंचिंग, सिच्युएशनशिप अशा सध्याच्या चर्चेत असणाऱ्या संकल्पनांवर तिचे मत काय आहे, यावर तिने वक्तव्य केले आहे.

ते खूप मोठे रेड फ्लॅग…

अभिनेत्री तेजश्री प्रधानने नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तेजश्री प्रधानने सिच्युएशनशिप, बेंचिंग या संकल्पनाबाबत तिचे मत व्यक्त केले. अभिनेत्रीने म्हटले, “जेन झी अशी जी संकल्पना आली आहे. ते सगळं मला भयंकर व भीतीदायक वाटायला लागलेलं आहे. आपण रेड फ्लॅग्स, ग्रीन फ्लॅग्सबद्दल बोलायला लागलो आहोत. सिच्युएशनशिप, बेंचिंग हे काही क्षणांपुरते चांगले वाटतात; पण ते खूप मोठे रेड फ्लॅग आहेत. त्यापासून दूर राहा, असं मला सांगायचं आहे. तुमच्या मानसिक आरोग्यासाठी ते चांगलं नाही आणि त्याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही. त्यामुळे बेंचिंग, सिच्युएशनशिप हे फार वाईट आहे.”

Vinod Kambli Diagnosed with Clots in Brain| Vinod Kambli Health Update
Vinod Kambli Health Update: विनोद कांबळींच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी, मोफत उपचार करण्याचा रुग्णालयाचा निर्णय
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
dhananjay munde valmik karad
Dhananjay Munde: “हे घ्या धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे धडधडीत पुरावे”, अंजली दमानियांनी सातबारेच केले शेअर!
Premachi Gosta
Video: ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये मुक्ता टाकीत बुडतानाचा सीन ‘असा’ झाला शूट; पाहा व्हिडीओ
Ladki Bahin Yojana
Maharashtra News LIVE Updates : लाडकी बहिण योजनेसंदर्भात आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची अपडेट…
sharad ponkshe reacts on trolling about daughter education
लेकीला शिकायला अमेरिकेला पाठवल्याने अजूनही होतंय ट्रोलिंग; शरद पोंक्षे म्हणाले, “काही लोकांच्या…”
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Suresh Dhas News
Suresh Dhas : संतोष देशमुख हत्या प्रकरण; सुरेश धस म्हणाले, “बीडमध्ये गँग्ज ऑफ वासेपूर सुरु आहे, आका…”

“मी आताच्या पिढीला खूप पाठिंबा देणारी आहे. मी स्वत:ला आजच्या दिवसाबरोबर पुढे नेऊया, असे म्हणणारी असले तरीही काही गोष्टींवर माझं ठाम मत आहे. त्यातील ही मोठी गोष्ट आहे की, ज्या क्षणाला तुम्ही तुमचा आत्मसन्मान बाजूला ठेवता, त्या क्षणाला तुम्ही स्वत:ला बेंचिंगचा भाग बनवता. तर तो बनू नका. कारण- आपल्या आई-वडिलांनी आपल्याला कायम प्राधान्य दिलंय. त्यामुळे नवीन येणारा मुलगा तुम्हाला प्राधान्य देत नसेल, तर आणि त्या बेंचवर बसवून ठेवणार असेल, तर ते तुमच्यासाठी चांगलं नाहीये, असं मला वाटतं. जोपर्यंत आपण स्वत:ला चांगली वागणूक देत नाही, तोपर्यंत आपल्याला कोणी चांगलं वागवावं ही जगात कोणाचीच जबाबदारी नाही. त्यामुळे मी स्वत:ला कुठे ठेवताय, तिथून तुम्ही इतरांनी तुमच्याशी कसं, काय वागायचं आहे, त्यासाठी स्वत:साठीचे बेंचमार्कस सेट करताय. सिच्युएशनशिपसारख्या गोष्टींपासून दूर राहा. या गोष्टी समजून घ्या”, असे म्हणत सिच्युएशनशिपसारख्या गोष्टी चांगल्या नसल्याचे तिने म्हटले आहे.

हेही वाचा: Allu Arjun : अल्लू अर्जुन पुन्हा अडचणीत; चेंगराचेंगरीनंतर आता ‘पुष्पा २’मधील ‘या’ सीनवरून वाद, काँग्रेस नेत्याने दिली तक्रार

दरम्यान, तेजश्री प्रधान ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. होणार सून मी या घरची या मालिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तिची जान्हवी ही भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. तिचा अभिनय, काहीही हं श्री यांसारखे मालिकेतील संवाद, जान्हवी या पात्राचे मंगळसूत्र आणि अशा अनेक इतर गोष्टी यांमुळे तेजश्री प्रधान घराघरांत पोहोचली. सध्या अभिनेत्री स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे. या मालिकेत तिने मुक्ताची भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेलादेखील प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळताना दिसते. मालिकांबरोबरच तिने अनेक चित्रपटांतदेखील काम करीत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Story img Loader