Tejaswini Pandit Viral Photo: सोशल मीडियावर सध्या एक फोटो खूप व्हायरल होत आहे. हा फोटो फोटो अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा आहे. या फोटोत तिच्याबरोबर एक व्यक्ती दिसत आहे, त्यामुळे या फोटोची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर राज ठाकरेंवर (Raj Thackeray) आधारित चित्रपट येणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित व राज ठाकरेंच्या कुटुंबियांचे जवळचे संबंध आहेत. अनेकदा तेजस्विनी राज ठाकरे यांच्याबरोबरचे फोटो पोस्ट करत असते. राजकारणावर मतं मांडताना ती राज ठाकरेंबद्दल बोलत असते. अशातच आता तिचा हा फोटो व्हायरल झाल्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येणार असल्याचे तर्कवितर्क लावले जात आहेत.
जॉन अब्राहमचा ‘वेदा’ की अक्षय कुमारचा ‘खेल खेल में’, कोणत्या सिनेमाने मारली बाजी? जाणून घ्या
या फोटोमध्ये राज ठाकरे यांच्यासारखी हुबेहुब दिसणारी एक व्यक्ती अभिनेत्री तेजस्विनी पंडितबरोबर दिसत आहे. फोटोत आजुबाजुला लोकही दिसत आहे. त्यामुळे हा फोटो शूटिंग सेटवरचा असल्याचं दिसतंय. तेजस्विनी पंडित जर राज ठाकरे यांच्यावर चित्रपट काढणार असेल तर यात राज ठाकरे यांची भूमिका कोण साकारणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता असेल.
दरम्यान, हा चित्रपट खरंच येणार का, चित्रपटात नेमकं काय दाखवण्यात ये? कोणते कलाकार असणार? अभिनेत्री, दिग्दर्शिका की निर्माती- तेजस्विनी पंडितची भूमिका यापैकी नेमकी कोणती? असेल असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. तेजस्विनी पंडितने याबाबत अद्याप माहिती दिलेली नाही. त्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरं तेजस्विनी कधी देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
© IE Online Media Services (P) Ltd