Maharashtra Assembly Election 2024 Tejaswini Pandit Post : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. २८८ मतदारसंघांत झालेल्या मतदानानंतर आज २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं आहे. पण, राज ठाकरेंच्या मनसेला २०२४ च्या निवडणुकीत एकही खातं उघडता आलेलं नाही. या निकालावर आता राजकीय वर्तुळासह मनोरंजन विश्वातून देखील प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अभिजीत केळकर, प्रसाद ओक, मेघा धाडे, सुशांत शेलार, परेश रावल यांसारखे अनेक कलाकार या विधानसभेच्या निकालांवर आपली मतं मांडत आहेत. अशातच अभिनेत्री तेजस्विनी पंडितने शेअर केलेली पोस्ट सर्वत्र चर्चेत आली आहे.

सोशल मीडियावर तेजस्विनी मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे व्हिडीओ व फोटो पोस्ट करत ती चाहत्यांना वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्याच्या अपडेट देत असते. अभिनयाबरोबरच तेजस्विनी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपले मत परखडपणे मांडत असते. आता नुकत्याच शेअर केलेल्या एक्स पोस्टमुळे तेजस्विनी चर्चेत आली आहे. ही पोस्ट आहे राज ठाकरे आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांसंदर्भातली. अभिनेत्री नेमकं या पोस्टमध्ये काय म्हणालीये जाणून घेऊयात…

Sunil Tatkare
Sunil Tatkare : “आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून…”; अमित शाह-शरद पवार भेटीनंतर सुनील तटकरेंची महत्त्वाची प्रतिक्रिया
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sai Pallavi reacts on turning vegetarian for Sita role in Ramayana
‘रामायण’ सिनेमासाठी मांसाहार सोडल्याचे वृत्त पाहून भडकली साई पल्लवी; कायदेशीर कारवाईचा इशारा देत म्हणाली…
Nitin Gadkari on Omraje Nimbalkar
Maharashtra News Highlights : “ताजमहल लवकर बांधून झाला पण..”, ठाकरेंच्या खासदाराचा संसदेत मराठीत प्रश्न, नितीन गडकरींनी दिले ‘असे’ उत्तर
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “महाविकास आघाडी आणि काँग्रेस आमदार, खासदारांंमध्ये अस्वस्थता; अनेकजण…”; चंद्रशेखर बावनकुळेंचं महत्त्वाचं वक्तव्य
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Maharashtra Breaking News Updates
Maharashtra News : “राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया’ निवडणुका जिंकत नसल्याचा शरद पवारांकडून ठपका”, उदय सामंतांचं वक्तव्य
Sanjay Raut
“…तर मोदींनी बांगलादेशमधील हिंदूंसाठी काहीतरी केलं असतं”, ठाकरेंच्या शिवसेनेची टीका

हेही वाचा : “जो हिंदू हित की बात करेगा…”, निवडणुकीच्या निकालांवर प्रसाद ओकचं वक्तव्य; अनेक मराठी कलाकार झाले व्यक्त

अभिनेत्री तेजस्विनी पंडितची पोस्ट

“विजयी उमेदवारांचं अभिनंदन! कोण? कसं? आणि काहीजण का नाही हे अनुत्तरीत राहिल, त्यांच्या Micro Management ला १००/१००. पण तरीही… राजसाहेब ठाकरे #एकनिष्ठ #सदैवसोबत. आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू” अशी भावुक पोस्ट शेअर करत तेजस्विनीने पुढे हार्टब्रेक इमोजी दिला आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरत आहे. तिच्या या पोस्टवर राज ठाकरेंच्या अनेक समर्थकांनी प्रतिक्रिया देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा : “संजय उगाच च…”, परेश रावल यांची मोजक्या शब्दांची पोस्ट चर्चेत; संजय राऊतांना टोला? नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा या निकालानंतर अगदी मोजक्या शब्दांची पोस्ट शेअर केली आहे. “अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच…” अशी प्रतिक्रिया त्यांनी या निकालांवर दिली आहे.

Story img Loader