सोशल मीडियामुळे जगभरातील लोकांबरोबर प्रत्येकाला जोडता येते. आपल्या आवडत्या व्यक्तींच्या आयुष्याविषयी जाणून घेता येते. अनेकविध पद्धतीचा कंटेन्ट पाहायला मिळतो. विविध प्रकारच्या संस्कृती पाहता येतात. महत्त्वाचे म्हणजे चाहत्यांना आपल्या आवडत्या कलाकारांना जाणून घेण्याची संधी मिळते. अनेकदा हे कलाकार अभिनयाबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. डान्सचे व्हिडीओ, ट्रेडिंग गाण्यावरील रील्स, तसेच अनेकदा खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी हे कलाकार चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसतात. कलाकारांनी शेअर केलेल्या फोटो, रील्स, व्हिडीओ यांसारख्या गोष्टींमुळे त्यांना चाहत्यांचे खूप प्रेम मिळताना दिसते. आता अभिनेत्री तेजस्विनी पंडित(Tejaswini Pandit)ने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. त्याबरोबरच नवीन वर्षासाठी कोणती गोष्ट ठरवली आहे, हेसुद्धा सांगितले आहे.
अभिनेत्री तेजस्विनी पंडितने नुकतीच सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे. हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने लिहिलेय, “काहीच कृत्रिम नको. सकाळचा चेहरा असाच असतो नाही का?
सध्या शरीराचंदाह खूप आहे आणि त्यावर काम चालू आहे. लवकर बरं व्हायचं आहे. सगळ्यात आधी आरोग्य हा या वर्षीचा संकल्प नाही, तर ध्यास आहे”, असे लिहित या वर्षी आरोग्याकडे लक्ष देण्यावर भर देणार असल्याचे अभिनेत्रीने लिहिले आहे.
अभिनेत्रीच्या या फोटोंवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत अभिनेत्रीचे कौतुक केले आहे. “खूप सुंदर”, असे म्हणत एका नेटकऱ्याने तेजस्विनीचे कौतुक केले आहे. तर एका नेटकऱ्याने म्हटले, “तू माझी सर्वांत आवडती अभिनेत्री आहेस.” तर इतर अनेक नेटकऱ्यांनी हार्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे. या सगळ्यात स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधव या अभिनेत्यांनीही हार्ट इमोजी शेअर केल्याचे दिसत आहे.
तेजस्विनी पंडितच्या कामाबद्दल बोलायचे, तर अभिनेत्रीने ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. मी सिंधुताई सपकाळ, ये रे ये रे पैसा, तू ही रे या चित्रपटांत तेजस्विनीने मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तसेच, तुझं नी माझं घर श्रीमंताचं या मालिकेत तिने काम केले आहे. समांतर, अहो विक्रमार्का, रान बाजार, १०० डेज यांमधील तिच्या भूमिकांनी लक्ष वेधून घेतले होते.