महाराष्ट्रात आज मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं. अजित पवारांनी विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना सोबत घेऊन त्यांना शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. इतकंच नव्हे तर त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. त्यांच्याबरोबरच राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. या राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या ट्वीटने लक्ष वेधून घेतलं आहे.

Ajit Pawar New Deputy CM : “मी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची…”, अजित पवारांनी घेतली शपथ

“भेळ हवीये भेळ ???? सर्वोत्तम भेळ आमच्या महाराष्ट्रात मिळेल !!!!” असं ट्वीट करत तेजस्विनीने त्याला Maharashtrapolitics असा हॅशटॅग दिला आहे. तिच्या या पोस्टवर नेटकरीही कमेंट्स करत आहेत. लोकशाही फक्त नावापूरतीच, बाकी सालटं काढायचं काम सुरूच राहील, असं एका युजरने म्हटलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
tejaswini pandit tweet on maharashtra politics
तेजस्विनी पंडितचं ट्वीट

दरम्यान, अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी उत्सुक होते, अशी चर्चा होती. त्यासाठी अजित पवार आपल्या समर्थक आमदारांच्या वतीने पक्षावर दबाव टाकत होते, पण आज अचानक अजित पवार राजभवनावर दाखल झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.