राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काही आमदारांना सोबत घेऊन आज बंडखोरी केली. शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांनी बंडखोरी केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. या राजकीय परिस्थितीवर अनेक नेते मंडळींसह मराठी कलाकारही प्रतिक्रिया देत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“भेळ हवीये भेळ?” राज्यातील राजकीय भूकंपाबद्दल तेजस्विनी पंडितचं ट्वीट चर्चेत; म्हणाली, “महाराष्ट्रात…”

महाराष्ट्राच्या राजकारणाला भेळ म्हणणाऱ्या अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आणखी एक ट्वीट केलं आहे. “तत्वनिष्ठ, सार्वभौम विचार आणि महाराष्ट्रावर अपार प्रेम अशाच माणसाने आता महाराष्ट्रावर ‘राज’ करावं. – महाराष्ट्राचा भरडलेला नागरिक,” असं तेजस्विनीने ट्वीटमध्ये म्हटलंय. यासोबतच तिने ‘महाराष्ट्र आता तरी जागा हो’ असा हॅशटॅग दिला आहे.

तेजस्विनी पंडितचं ट्वीट

तेजस्विनीने तिच्या ट्वीटमध्ये राज शब्द वापरला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महाराष्ट्राचं नेतृत्व राज ठाकरे यांनी करायला हवं, असं अप्रत्यक्ष ट्वीट तेजस्विनीने केलं आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

तिच्या ट्वीटवर नेटकऱ्यांनीही राज ठाकरेंचा उल्लेख करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांनीही आजच्या राजकीय घटनेवर भाष्य केलंय.

‘चिखल’: राज ठाकरेंची महाराष्ट्रातील राजकारणावर मार्मिक प्रतिक्रिया

“आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच!” असं राज ठाकरेंनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tejaswini pandit tweet on maharashtra politics raj thackeray hrc