‘डेट विथ सई’, ‘बोगदा’, ‘कौल-ए कॉलिंग’, ‘वाय’, ‘बाली’, ‘जीव झाला वेडापिसा’, ‘मी पुन्हा येईन’, ‘समायरा’ अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा अभिनेता म्हणजे रोहित कोकाटे( Rohit Kokate). ‘द शेमलेस’ या चित्रपटामुळे त्याची मोठी चर्चा होताना दिसली. कान्स महोत्सवात या चित्रपटाच्या टीमने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.आता एका मुलाखतीत अभिनेत्याने कान्स महोत्सवाचा अनुभव कसा होता, यावर मत व्यक्त केले आहे.

काय म्हणाला अभिनेता?

अभिनेता रोहित कोकाटेने नुकतीच ‘अल्ट्रा मराठी बझ’ला मुलाखत दिली. यावेळी कान्स महोत्सवात जाण्याचा अनुभव कसा होता, या प्रश्नाचे उत्तर देताना अभिनेत्याने म्हटले, “कान्सचा अनुभव खूपच छान होता. खूप आधीपासून कान्स, बर्लिन फिल्म फेस्टिव्हल बघत आलो. प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. हा चित्रपट झाला तेव्हा असं काही वाटलं नव्हतं की, हा चित्रपट निवडला जाईल आणि ‘कान्स’ची संधी मिळेल. आतापर्यंत मी भारताबाहेर कधीच गेलो नाही. मी पहिल्यांदाच गेलो आणि ‘कान्स’साठी गेलो ही माझ्यासाठी पहिली गोष्ट आहे. एक अभिनेता आणि माणूस म्हणून वेगवेगळ्या गोष्टी शिकता आल्या. वेगवेगळ्या देशांतील चित्रपट निर्माते, दिग्दर्शकांच्या ओळखी झाल्या. मला मनापासून वाटते की, प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात अशी संधी यावी.”

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Tejashri Pradhan
तेजश्री प्रधानचा सिच्युएशनशिप, बेंचिंगबाबत तरुण पिढीला सल्ला; म्हणाली, “ज्या क्षणाला तुम्ही तुमचा आत्मसन्मान…”
punha kartvya aahe
Video: “तुम्ही कितीही दूर…”, वसुंधराने केला सासूचे मन जिंकण्याचा निर्धार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो
Somnath Suryawanshi Mother
Somnath Suryawanshi Mother : राहुल गांधींच्या भेटीनंतर सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा साश्रू नयनांनी दावा, “माझ्या मुलाला मारहाण करुन त्याचे…”
Sridevi
श्रीदेवीला पाहताच विनोद खन्ना, ऋषी कपूर व इतर दिग्गज अभिनेत्यांनी केलेली ‘ही’ गोष्ट; प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “अचानक ते…”

एका शेतकरी कुटुंबातील मुलाला असे का वाटले की, अभिनय क्षेत्रात आपण जावे? त्यावर बोलताना रोहित कोकाटेने म्हटले, “जन्म झाल्यापासून चार-पाच वर्षाचा झाल्यानंतर मला कळायला लागलं तेव्हापासून मी टीव्ही बघतोय. मग नंतर भाषा शिकलो. हिंदी हळूहळू कळायला लागलं. मी एकही फिल्म सोडत नव्हतो. शाळा-कॉलेजमध्ये असताना सगळे चित्रपट बघायचो. जेव्हा मी शिक्षणासाठी पुण्यात आलो. तेव्हा कळलं की, थिएटर वगैरे गोष्टी शिकवल्या जातात. २००४-०५ या काळात मॉडेलिंग खूप ट्रेंडिंग होतं. जॉन अब्राहम वगैरे आधी मॉडेल होते; मग हिरो व्हायचे. मग असं वाटायचं की, अभिनेता होण्यासाठी हेच केलं पाहिजे. नंतर मला एकानं सांगितलं की, अरे हे उपयोगाचं नाहीये, तर तुला अभिनय कार्यशाळा करावी लागेल. मी म्हटलं की, मला यात इंटरेस्ट नाहीये, मला हिरो व्हायचं आहे. मग मी पुण्यात पीडीए नावाची संस्था आहे. तिथे मी कार्यशाळा केली. तिथून माझा प्रवास सुरू झाला.”

घरच्यांनी या क्षेत्रात जाण्यासाठी परवानगी कशी दिली? यावर बोलताना अभिनेत्याने म्हटले, “माझी एक एकांकिका होती. ती बघायला मी मावशी-काकांना बोलावलं होतं. काकांनी पप्पांना सांगितलं की, चांगलं करतोय पोरगं; करू दे. मग त्यांनीसुद्धा परवानगी दिली. पण त्यांची इच्छा अजूनही नाहीये की, मी यामध्ये काम करावं. त्यांचं म्हणणं आहे की, तू गावी ये आणि नोकरी, व्यवसाय काय करायचं ते कर.”

पुढे रोहितने, “मी साधारण कॉलेजच्या दुसऱ्या-तिसऱ्या वर्षापर्यंत तोतरं बोलायचो आणि त्यात मला हिरो व्हायचं होतं. शाळेत उत्तर द्यायला उठलो की, वर्ग हसायचा. त्यामुळे त्यावर काम करायला मला अडीच-तीन वर्षं लागली. न्यूनगंड होता. बोलत नव्हतो. ठरावीक चार मित्रांच्यात बोलायचो. घरी बोलायचो. नाटकात, टीव्हीमध्ये एका विशिष्ट पद्धतीनं बोलायला लागतं. त्यामुळे करिअरच्या सुरुवातीच्या काळात मला नकारच नकार मिळायचे. नंतर काम मिळत गेलं; पण भूमिका छोट्या असायच्या. मग एकदा सुटीसाठी घरी गेलो होतो. घरच्यांनी ठरवलेलं की, आता रोहित आला की, त्याला परत पाठवायचं नाही. त्याच वेळी मला दोन चित्रपट मिळाले,” असे म्हणत अभिनेत्याने करिअरची सुरुवात कशी झाली याबद्दल वक्तव्य केले आहे.

हेही वाचा: टीव्हीवर प्रदर्शित होणार होता ‘आशिकी’ सिनेमा, गाणी हिट झाल्यावर बनवला चित्रपट, बजेट होतं फक्त ‘इतके’ लाख

दरम्यान, अभिनेता रोहित कोकाटेने त्याच्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तो अनेकविध चित्रपट, वेब सीरिज या माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतो.

Story img Loader