Third Eye Asian Film Festival : महाराष्ट्रातील चित्रपट संस्कृतीचा मानदंड असणारा ‘२१ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’ १० जानेवारी ते १६ जानेवारी २०२५ या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे आयोजित केला जाणार आहे. महोत्सवात निवडलेले ६१ चित्रपट मुव्हीमॅक्स अंधेरी, सायन आणि ठाणे येथे दाखवले जातील. कान महोत्सवात अ-सर्टन रिगार्ड विभागात सर्वोत्तम ठरलेल्या ‘द ब्लॅक डॉग’ या चायनीज चित्रपटाच्या प्रदर्शनाने महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे.

परदेशातील विशेषत: हॉलिवूड आणि युरोपमधील चित्रपट भारतीय प्रेक्षकांना पाहण्यासाठी सहज उपलब्ध होऊ लागले आहेत. पण त्याचवेळी जागतिक स्तरावर गाजत असलेले आशियाई चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये लोकप्रिय असलेले हे चित्रपट मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर शहरातील प्रेक्षकांना दाखविण्याच्या उद्देशाने ‘एशियन फिल्म फाऊंडेशन’ने ‘थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल’चे आयोजन सुरू केले. पहिला महोत्सव ३ ऑगस्ट २००२ रोजी आयोजित करण्यात आला होता. गेल्या वीस वर्षांपासून हा चित्रपट महोत्सव मुंबईत आयोजित केला जात आहे.

Bhool Bhulaiyaa 3 Singham again on OTT
सिंघम अगेन व भूल भुलैया थिएटरनंतर एकाच दिवशी OTT वर रिलीज होणार, कुठे येणार पाहता? वाचा
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार
legendary filmmaker shyam benegal
अग्रलेख: भारत भाष्य विधाता!
tharla tar mag can arjun sayali meets again madhubhau took strict decision
ठरलं तर मग : सायली-अर्जुनचं नातं कायमचं तुटणार? मधुभाऊंनी लेकीकडून घेतलं ‘हे’ वचन, तर दारात आलेला अर्जुन…; पाहा प्रोमो
Navri Mile Hitlarla
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’मधील एजे-लीलाच्या रोमँटिक सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
zee marathi lakshmi niwas serial new promo
‘लक्ष्मी निवास’मध्ये दमदार कलाकारांची मांदियाळी! ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याचं पुनरागमन, नव्या प्रोमोत झळकले सगळे कलाकार…
top 10 bockbuster movies 2024
Year Ender 2024 : ‘हे’ १० चित्रपट ठरले ब्लॉकबस्टर, बॉक्स ऑफिसवरील कमाईसह प्रेक्षकांचीही मिळवली पसंती; वाचा यादी

‘थर्ड आय आशियाई’ चित्रपट महोत्सवाच्या २१ व्या आवृत्तीत आशियाई स्पेक्ट्रम विभागात चीन, भूतान, नेपाळ, बांगलादेश, मलेशिया, कझाकिस्तान, ट्युनिशिया, जपान, इराण, साउथ कोरिया आणि श्रीलंका या देशातील चित्रपटांचा समावेश आहे आणि साउथ कोरिया मधील सहा चित्रपट कंट्री फोकस विभागात दाखवले जातील.

हेही वाचा : “लक्ष्मी हा माझा ड्रीम रोल…”, नव्या मालिकेविषयी काय म्हणाल्या हर्षदा खानविलकर? ‘ती’ इच्छा खरी ठरली…

आशियाई चित्रपटांबरोबरच भारतीय चित्रपट आणि मराठी चित्रपटांचा स्पर्धा विभाग हे महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. भारतीय चित्रपट विभागात मल्याळम, कन्नड, तेलुगू, बंगाली, आसामी या भाषांमधील अकरा चित्रपटांचा समावेश आहे. त्यात नवीनचंद्र दिग्दर्शित ‘झंझारपुर’, प्रबल खुंद दिग्दर्शित ‘पाई तंग’, जदुमनी दत्ता दिग्दर्शित ‘जुईफुल’ या चित्रपटांचा समावेश आहे.

मराठी स्पर्धा विभागात आठ मराठी चित्रपट दाखवले जाणार आहेत. आशा (दिग्दर्शक दीपक पाटील), सिनेमॅन (दिग्दर्शक उमेश बगाडे), कर्मयोगी आबासाहेब (दिग्दर्शक अल्ताफ शेख ), जिप्सी (दिग्दर्शक शशी खंदारे), भेरा (दिग्दर्शक श्रीकांत भिडे), मॅजिक (दिग्दर्शक रवी करमरकर), मंडळ आभारी आहे (दिग्दर्शक विद्यासागर अध्यापक), छबिला (दिग्दर्शक अनिल भालेराव) यांचा या स्पर्धा विभागात समावेश करण्यात आला आहे. या महोत्सवात सुप्रसिद्ध पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांना ‘आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार’ देण्यात येणार असून आणि पत्रकार रफिक बगदादी यांना ‘सत्यजित राय मेमोरियल पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाणार आहे.

दिवंगत सुधीर नांदगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षी चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार चित्रपट अभ्यासक अनिल झणकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. दिवंगत दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांचे प्रदर्शन करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. तसेच राज कपूर यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांची भूमिका असलेले चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.

महोत्सवादरम्यान चित्रपट प्रदर्शनासोबतच मान्यवर ज्युरी सदस्यांबरोबर ओपन फोरम, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांसह मास्टर क्लासचे आयोजन करण्यात येणार आहे.महोत्सवाची प्रतिनिधी नोंदणी http://www.thirdeyeasianfilmfestival.com या वेबसाइटवर सुरु झाली आहे. प्रतिनिधी शुल्क १००० रुपये असून, फिल्म सोसायटी आणि विद्यार्थ्यांसाठी हे शुल्क ७५० रुपये असणार आहे.

Story img Loader