प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर’ हा चित्रपट चांगलाच गाजला. ठाण्याचा वाघ म्हणून ख्याती असलेले धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. ‘धर्मवीर’ चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओकने उत्तमरीत्या साकारली होती. त्यासाठी प्रसादला सर्वोकृष्ट अभिनेता असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. दरम्यान, आनंद दिघे यांची भूमिका दुसराच अभिनेता साकारणार होता, याचा खुलासा प्रवीण तरडे यांनी केला आहे.
‘बोल भिडू’ या यूट्युब चॅनेलवरील ‘दिलखुलास गप्पा’ कार्यक्रमात नुकतेच प्रवीण तरडे व उपेंद्र लिमये सहभागी झाले होते. यावेळी प्रवीण तरडे लोकप्रिय दाक्षिणात्य दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या भेटीविषयी बोलत होते. त्यावेळी त्यांनी आनंद दिघे यांची भूमिका कोणता अभिनेता साकारणार होता याचा खुलासा केला.
हेही वाचा – “‘मुळशी पॅटर्न’ पाहिल्यावर कॉलर तोंडात पकडून कौतुक करणाऱ्या सलमानने…”, उपेंद्र लिमये यांचं विधान
प्रवीण तरडे म्हणाले, “मला राजमौली यांच्यासारखं तुमचं राज्य, तुमची भाषा, तुमच्या समाजाच्या जगण्या-वागण्याचे प्रश्न हे कुठेतरी पुढे घेऊन जायचे आहेत. म्हणून माझे राजमौली आदर्श आहेत. कधी त्यांना भेटेन, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं; पण एक योग आला, तो म्हणजे ‘धर्मवीर’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शन.”
हेही वाचा – सुनील बर्वे साकारणार सुधीर फडकेंची भूमिका; म्हणाले, “आजपासून तुमचं…”
हेही वाचा – “… तर ‘मुळशी पॅटर्न’ १०० कोटी क्रॉस केलेला चित्रपट असता”; दिग्दर्शक प्रवीण तरडे खंत व्यक्त करीत म्हणाले…
प्रवीण तरडे पुढे म्हणाले की, ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपट खूप मोठ्या पातळीवर झाला होता. ‘झी’चं पाठबळ होतं. चित्रपट त्याच ताकदीनं बनवला होता. याच्यात माझं लेखक-दिग्दर्शक म्हणून श्रेय असण्याचं काही काम नाही. कारण- ते सगळं श्रेय आनंद दिघे यांचं आहे. खरं तर पहिल्यांदा आनंद दिघे तू (उपेंद्र लिमये) करणार होतास. म्हणजे मी चित्रपट बनवायच्याही आधी आनंद दिघे यांच्यावरील चित्रपटाचं काम चार-पाच वर्षं मागेच सुरू झालं होतं. तेव्हा उपेंद्र लिमये आनंद दिघेसाहेबांची भूमिका करणार होता. खरं तर माझ्या प्रत्येक चित्रपटात तू असतोस; पण आपलं ते राहिलं.”