अलीकडेच ६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली. सिनेसृष्टीसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणार हा पुरस्कार आहे. यंदाच्या या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान लोकप्रिय गायक, संगीतकार, गीतकार सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाने पटकावला. पण आणखी एक राष्ट्रीय पुरस्कार सलील कुलकर्णी यांना मिळाला आहे. तो कोणता? जाणून घ्या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “मुक्ताच्या आणखी प्रेमात पडावं…” लेखक क्षितिज पटवर्धनची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…

सलील कुलकर्णी सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. नवनवीन पोस्ट शेअर करत असतात. नुकतीच त्यांनी एक पोस्ट केली आहे; ज्यामध्ये त्यांनी दुसऱ्या राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा उल्लेख केला आहे. सलील यांनी या पोस्टमध्ये लिहीलं आहे की, “गणपतीबाप्पा मोरया…भारतरत्न लतादीदी दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय महाविद्यालयात भावसंगीतचा अभ्यासक्रम माझ्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्याचा निर्णय मंगेशकर कुटुंबीयांनी आणि सुरेशजी वाडकर, मयुरेश पै आणि राजीवजी मिश्रा यांनी घेतला. हा मला एका महिन्यात मिळालेला दुसरा राष्ट्रीय पुरस्कार आहे असं मी मानतो ….मी मनापासून दीदींचं नाव जपण्याचा प्रयत्न करीन…”

हेही वाचा : गौरी सावंत यांच्याबरोबर ‘ताली’ टीमनं पाहिलं ‘चारचौघी’ नाटक; रवी जाधव म्हणाले, “असं क्वचितच…”

यायाच अर्थ भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात आता सलील कुलकर्णी भावसंगीत शिकवणार आहेत. या अभ्याक्रमाचा कालावधी ६ महिने असून प्रवेश क्षमता ५० जणांची आहे. सलील यांची ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, “अभिनंदन, अजून एक तुरा तुमच्या शिरपेचात.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, “वाह वाह वाह….सुरेखच…अनेका अनेक शुभेच्छा दादा…”

हेही वाचा – “ती जागा हाफ चड्डीची नाही”, गणेश भक्तांसाठी जारी केलेल्या ड्रेसकोडवर दीपाली सय्यद यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “संपूर्ण महाराष्ट्रात…”

हेही वाचा – Video: अविनाश-ऐश्वर्या नारकरांनी केलेलं ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’चं नवीन व्हर्जन पाहिलंत का? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

दरम्यान, सलील कुलकर्णी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ते सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मध्ये परीक्षक म्हणून काम करत आहेत. तसेच दुसऱ्या बाजूला ‘आयुष्यावर बोलू काही’ला २० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं हा कार्यक्रम पुन्हा सुरू केला आहे. सलील यांनी ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर गेल्यावर्षी त्यांचा ‘एकदा काय झालं’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सलील यांच्या या देखील चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This is my second national award in a month says saleel kulkarni pps
Show comments