सकाळी उठले की सगळ्यात पहिल्यांदा लागतो तो चहा. आजपर्यंत आपण अनेक चहाप्रेमी बघितले असतील. कहीही झाले तरी यांना चहा लागतोच. भारतात चहाप्रेमींचे प्रमाण मोठे आहे. आपल्या आजूबाजूला आपण असे चहाप्रेमी बघितले असतील. मात्र, मराठी मनोरंजनसृष्टीत अशी एक अभिनेत्री आहे, जिच्यासाठी चहा सर्वस्व आहे. या चहापायी तिने ओरडाही खाल्ला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कुणी नसून सायली संजीव आहे. सायलीला चहाचे खूप वेड आहे. ती सतत चहा पीत असते. चित्रपटाच्या सेटवरही ती अनेकदा चहा पित असते. अलीकडेच अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने १०६.४ या रेडिओ चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने सायलीच्या चहा पिण्याच्या सवयीबाबत खुलासा केला आहे.

सिद्धार्थ म्हणाला, “सायली दिवसातून ९३ कप चहा पित असते. मला कधी कधी वाटतं की, ‘तिच्या तोंडातून बागा बाहेर येतील.’ यावर सायली म्हणाली, चहासाठी मला अनेकदा ओरडाही बसला आहे. जे लोक मला खूप चहा पिते म्हणून ओरडतात, तेच दुसऱ्या मिनिटाला माझ्यासाठी चहाची ऑर्डर करतात.”

हेही वाचा- “हे मृगजळ आहे”, तेजश्री प्रधानने सांगितलं यश म्हणजे काय? सल्ला देत म्हणाली…

सायली व सिद्धार्थच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, काही महिन्यांपूर्वीच त्यांचा ‘झिम्मा २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. आता नुकताच त्यांचा ‘ओले आले’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सिद्धार्थ व सायलीबरोबर नाना पाटेकर, मकरंद अनासपुरेंची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.