राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘थ्री इडियट्स’ चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटातील रांचो, फरहान, राजू या मुख्य पात्रांबरोबर इतर सहाय्यक पात्र देखील तितकीच लोकप्रिय झाली. त्यापैकी एक म्हणजे चतुर रामलिंगम उर्फ सायलेन्सर. अभिनेता ओमी वैद्यने ही भूमिका उत्तमरित्या निभावली होती. आता हाच ओमी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. लवकरच एका हटके भूमिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘थ्री इडियट्स’मधील चतुर रामलिंगम ही भूमिका साकारल्यावर प्रेक्षकांना अभिनेता ओमी वैद्य केरळी, केन्यन, मल्याळी, आफ्रिकन आहे असं वाटे, पण तो तर एक मराठी मुलगा आहे. आणखीन आश्चर्याची गोष्ट म्हणजे ओमीने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतल्या महाराष्ट्र मंडळामधील गणेश उत्सवातल्या नाटकाने केली होती. मग पहिला चित्रपट दिग्दर्शित करायचा तर तो मायभाषेतच या ओमीच्या निर्णयाबद्दल कुणाला नवल वाटायचं कारण नाही. तर मग आता ओमीची प्रमुख भूमिका असलेला, टीएटीजी फिल्म्स एलएलपीची प्रस्तुती असलेला ‘आईच्या गावात मराठीत बोल’ हा धम्माल विनोदी चित्रपट येत्या १९ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात समर ही प्रमुख भूमिका ओमी साकारणार आहे.

Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Sarangi maestro Pt Ram Narayan passes away
व्यक्तिवेध : पं. रामनारायण
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
delhi ganesh demise
दाक्षिणात्य अभिनेते दिल्ली गणेश यांचं वृद्धापकाळाने निधन, हवाई दलातील सेवेनंतर सिनेसृष्टीत केलं होतं पदार्पण; ‘अशी’ होती कारकीर्द
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी
Musical dance drama Urmilayan Aryans Group of Companies Kamesh Modi
सांगीतिक नृत्यनाट्य ‘ऊर्मिलायन’

हेही वाचा – ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, गोव्यात थाटात केलं लग्न; पाहा व्हिडीओ अन् फोटो

अमेरिकेतून भारतात आल्यावर अनपेक्षित वळणांचा प्रवास प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. वाक्यागणिक मराठीचा अपभ्रंश करणारा, धेडगुजरी बोलणाऱ्या समरची कायापालट होऊ शकते का? साता समुद्रापार वसलेली आपल्या महाराष्ट्राची मुलं बाळं एक आधुनिक “मराठीपण” जोपासू शकतील का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समरला गवसतातच. पण प्रेम, कुटुंब, स्वतःची पाळंमुळं याचा खरा अर्थही जसा समरला सापडतो तसाच त्याचा हा प्रवास प्रेक्षकांनाही भावेल.

या चित्रपटाची निर्मिती अहमद लुकान, डॉ. पुनीत चांडक, डॉ. सुमुल रावल, मार्थेश्वरन सोलामुथू, माईक कासिन, राजन वासुदेवन, संजय सहगल, शाहीन गांधी, स्टीव्हन मोरलँड, सुप्रतीम डे, उदय कुमार यांनी केली आहे. अमेरिकेत जन्मलेला पण महाराष्ट्रबद्दल उर्मी असणारा ओमी वैद्य आणि अमेरिकेत राहत असून मराठीचा वसा जोपासणाऱ्या अमृता हर्डीकर यांनी अमेरिकेतच या चित्रपटाची कथा,पटकथा आणि संवाद लिहून चित्रपटाची आखणी सुरू केली. सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी योगेश कोळी यांनी सांभाळली असून संगीत आणि पार्श्वसंगीत अविनाश विश्वजीत यांनी दिलं आहे. तसेच या चित्रपटाचे संकलन मयूर हरदास आणि ओमी वैद्य यांनी केलं आहे.

हेही वाचा – ‘बिग बॉस मराठी’ विजेता अक्षय केळकरला लागलं म्हाडाचं घर; राखी सावंतने दिला सल्ला, म्हणाली, “आता…”

‘आईच्या गावात मराठीत बोल’ या चित्रपटात ओमी वैद्य व्यतिरिक्त संस्कृती बालगुडे, पार्थ भालेराव, विद्याधर जोशी, इला भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, नेहा कुलकर्णी, ओंकार थत्ते, ध्रुव दातार, सायली राजाध्यक्ष सुधीर जोगळेकर असे कसलेले कलाकार आहेत. ओमी वैद्य पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम करत असल्याने रसिक प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.