‘शिवाजी जन्माला यावा, पण शेजारच्या घरात…’ असं खूपदा म्हटलं जातं. याचं कारण शिवाजीमहाराज कितीही पराक्रमी असले, त्यांना भरपूर नावलौकिक मिळाला, त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, तरी त्यांच्या असण्याने त्या घराला जे भोगावं लागतं, त्या घरातल्यांची जी ससेहोलपट होते ती कुणालाच नको असते. ती असह्य असते. म्हणूनच मोठ्या महापुरुषांचे गोडवे गायले जातात, पण त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या कार्यापोटी काय काय भोगलं, त्यांच्या घरादाराची काय राखरांगोळी झाली याबद्दल लोकांना फारशी कल्पना नसते. त्यांच्या बायका-मुलांचे काय हाल झाले हे फारसं उजेडात येत नाही. गांधीजींचे चिरंजीव हरीलाल यांनी आपल्या वडिलांबद्दल जो राग व्यक्त केला, तो पाहता अशा महापुरुषांच्या घरातील गृहछिद्रं उघड होतात. अशा अनेक महापुरुषांच्या कुटुंबांच्या दर्दनाक कहाण्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्याबद्दल आपण अनभिज्ञ असतो. त्या महापुरुषांचं कर्तृत्व सर्वांमुखी असतं, पण त्यांच्या कुटुंबीयांचं पुढे काय झालं, त्यांना कोणकोणत्या संकटांतून जावं लागलं हे अज्ञातच राहतं. गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांच्याबद्दल तरी बरंच साहित्य उपलब्ध आहे. पण सावरकर कुटुंबीय, बयो कर्वे, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल मात्र तितकीशी माहिती उपलब्ध नाही. त्यांनी घरातल्या कर्त्या पुरुषांच्या राष्ट्रकार्यात कशा प्रकारे त्यांना साथ दिली, काय हालअपेष्टा सोसल्या, संकटांचा कसा सामना केला… वगैरे गोष्टी फारच अत्यल्प लोकांपर्यंत पोहोचल्यात. त्यांच्याप्रति समाजाची कृतज्ञता कधीच व्यक्त झाली नाही. ‘नाही चिरा, नाही पणती’ अशीच त्यांची अवस्था झालेली दिसते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा