आजकाल फेसबुक , इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्यक्ती आपले फोटो शेअर करत असतात. बॉलिवूडप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारदेखील सोशल मीडियावर सक्रीय असतात. अभिनेते, अभिनेत्री आपले फोटोशूट नवे लुक्स, नव्या चित्रपटांची माहिती ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. आता यात दिग्दर्शकदेखील मागे नाहीत. आनंदी गोपाळ, धुराळा चित्रपटाचा दिग्दर्शक समीर विद्वांस सोशल मीडियावर कायमच पोस्ट करत असतो.
मराठीतले प्रख्यात दिग्दर्शक रवी जाधव यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर महाविद्यालयात असताना एक जुना फोटो शेअर केला आहे. त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरचा डीपी बदलला आहे. आणि महाविद्यालयात असतानाचा फोटो डीपी म्हणून ठेवला आहे. दिग्दर्शक रवी जाधव यांनी जे. जे स्कुल ऑफ आर्टस् या महाविदल्यातून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी बराच काळ जाहिरात क्षेत्रात काम केले आहे.
चित्रमहर्षी व्ही. शांताराम यांनी ‘या’ कारणासाठी दिला होता ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटाला होकार
अनेक वर्ष ते मोठ्या जाहिरात कंपनीत काम करून ते चित्रपटांकडे वळले नटरंग चित्रपटातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण करणार आहेत. ‘टाईमपास’, ‘न्यूड’ यासारखे वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले आहेत. त्यांची स्वतःची निर्मिती संस्था आहे. नुकताच त्यांचा ‘टाईमपास ३’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
रवी जाधव ‘टाईमपास ३’ च्या यशानंतर आता हिंदी वेबसिरीजवर काम करत आहेत. ट्रान्सजेंडर एक्टिविस्ट गौरी सावंतच्या बायोग्राफीवर ही वेब सीरिज आधारलेली आहे. ज्यात सुश्मिता सेन मुख्य भूमिकेत दिसणार आहे याआधी त्यांनी ‘बँजो’ नावाचा हिंदी चित्रपट केला होता, रितेश देशमुख त्यात मुख्य भूमिकेत होता.