मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परब सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ‘टाइमपास’ चित्रपटातून प्रसिद्धी मिळविलेल्या प्रथमेश ‘टकाटक’, ‘उर्फी’, ‘बीपी’, ‘एक नंबर’ अशा चित्रपटातून अभिनयाचा ठसा उमटवला. नुकतंच प्रथमेश अजय देवगणच्या ‘दृश्यम २’ या चित्रपटातही झळकला. मात्र टाईमपास चित्रपटाने तो प्रसिद्धीच्या झोतात आला. या चित्रपटाची आठवण त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

प्रथमेश परब सोशल मीडियावर सक्रीय असतो. त्याने ‘टाईमपास’ चित्रपटातील फोटो शेअर करत लिहले आहे, “३ जानेवारी दिवसाने माझे पूर्ण आयुष्य बदलले. या दिवसाने मला दगडू नावाची नवी ओळख मिळवून दिली. जी आयुष्यभर माझ्याबरोबर असणार आहे. ज्या दिवसाने मला मोठा ब्रेक दिला. जो प्रत्येक अभिनेत्याला हवा असतो. ज्या दिवसाने स्वप्नांवर विश्वास ठेवायला शिकलो. हा दिवस माझ्यासाठी कायम लक्षात राहील.” अशा शब्दात त्याने आपल्या भावाना व्यक्त केल्या.

lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
when sanjay kapoor slapped madhuri dixit in raja movie
“संजय कपूरने माधुरी दीक्षितला झापड मारल्यावर…”, दिग्दर्शकाने सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाला, “मला वाटलं माझं करिअर संपलं”
Ajit Pawar
Ajit Pawar : “तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात…”, अजित पवार भर सभेत संतापले, नेमकं काय घडलं?
siddharth chandekar special connection with 24 January
सिद्धार्थ चांदेकरच्या आयुष्यात ‘२४ जानेवारी’चं आहे खास महत्त्व! काय आहे कनेक्शन? ‘तो’ Video शेअर करत म्हणाला…
Bhushan Prabhan
“कलाकार म्हणून आपण एकमेकांचा आदर करणं शिकलो नाही”, भूषण प्रधानकडून खंत व्यक्त; म्हणाला…

विश्लेषण : बॉलिवूडच नाही, हॉलिवुडमध्येही घराणेशाहीवरून वाद; ‘नेपो बेबी’ म्हणत स्टार कीड्स होतायत ट्रोल! वाचा नेमकं घडतंय काय?

‘टाईमपास ३’ हा नुकताच प्रदर्शित झाला होता, ज्यात ऋता दुर्गुळे अभिनेत्री म्हणून दिसली होती. पहिल्या भागात दगडू प्राजक्ता यांची प्रेमकहाणी दाखवण्यात आली होती. कॉलेज विश्वातील प्रेम मग ताटातूट असे चित्रपटाचे कथानक होते. प्रथमेश परब, केतकी माटेगावकर मुख्य भूमिकेत होते. तर वैभव मांगले, भाऊ कदम हे विशेष भूमिकेत होते.

दिग्दर्शक रवी जाधव यांनी ‘टाईमपास’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. चित्रपटातील संवाद प्रियदर्शन जाधवने लिहले आहे, यात चित्रपटातील गाणी, संवाद विशेष गाजले. ३ जानेवारी २०१४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने ३३ कोटींची कमाई केली होती.

Story img Loader