रवी जाधव दिग्दर्शित ‘टाइमपास’ या चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. २०१४ प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. ‘टाइमपास’मधील डायलॉग, गाणी सुपरहिट झाली होती. शिवाय चित्रपटातील पात्र देखील प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. त्यामुळे रवी जाधव यांनी ‘टाइमपास २’ आणि ‘टाइमपास ३’ देखील प्रेक्षकांच्या भेटीस आणला. या देखील चित्रपटांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

‘टाइमपास’ या चित्रपटामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला लाडका दगडू म्हणजे अभिनेता प्रथमेश परब काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकला. २४ फेब्रुवारीला प्रथमेशने क्षितिजा घोसाळकरशी लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता ‘टाइमपास’ चित्रपटातील एका अभिनेत्यानं लग्नाविषयी भाष्य केलं आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – रामानंद सागर यांच्या ‘श्री कृष्ण’ मालिकेतील चिमुकल्याला ओळखलंत का? मराठी मालिकेत अभिनेता, लेखक म्हणून केलंय काम

‘टाइमपास’ चित्रपटातील दगडू या भूमिकेबरोबर बालभारती, कोंबडा आणि मलेरिया या भूमिका हीट झाल्या होत्या. यामधील मलेरिया म्हणजे अभिनेता जयेश चव्हाण लग्नाबाबत बोलला आहे. नुकतंच त्याने चाहत्यांबरोबर इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’द्वारे संवाद साधला. यावेळी चाहत्यांनी त्याला लग्नाविषयी अनेक प्रश्न विचारले, तेव्हा जयेशने चाहत्यांना भन्नाट उत्तर दिली.

एका चाहत्याने जयेशला विचारलं की, लग्न कधी करतोय? तेव्हा अभिनेता म्हणाला, “लग्न आणि माझा दूरपर्यंत काही संबंध नाही. लग्न झाल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.”

तसेच दुसऱ्या चाहत्याने विचारलं, “लोकांना तुझ्या लग्नाचं इतकं का टेन्शन आहे?” यावर जयेश म्हणाला, “मस्त जगतोय, ते लोकांना बघवत नसतं आणि टेन्शन आपण घेत नाय. मग माझ्यावरचं टेन्शन कदाचित ते घेत असावेत.”

हेही वाचा – मालिकेच्या सेलिब्रेशन केकवर देवीचा फोटो, युजरने आक्षेप घेतल्यावर ‘झी मराठी’ने दिलं स्पष्टीकरण, लिहिलं…

दरम्यान, जयेशने ‘टाइमपास’ या चित्रपटानंतर अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. ‘35% काठावर पास’, ‘टाइमपास ३’, ‘इपतिर’, ‘दिल बेधुंद’ यांसारख्या चित्रपटात जयेश पाहायला मिळाला. शिवाय तो काही अल्बम साँगमध्ये झळकला होता.

Story img Loader