सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ २’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘नाळ’च्या पहिल्या भागाला मिळलेल्या भरघोस प्रतिसादानंतर ‘नाळ’चा दुसरा भाग १० नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाला सुद्धा प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ‘नाळ’च्या पहिल्या भागातल्या चैत्याने जशी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्याप्रमाणे आता ‘नाळ २’मधील चिमीने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
बालकलाकर त्रिशा ठोसरने चिमीची भूमिका साकारली आहे. तिचा हा पहिला चित्रपट असला तरी त्रिशाने ‘नाळ २’मधील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नुकत्याच एका एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी त्रिशाच्या आईने म्हणजेच गौतमी ठोसर यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्रिशाच्या ऑडिशनचा किस्सा सांगितला.
हेही वाचा – “आता खूप बदललास…” एल्विश यादवने सलमान खानचा फोटो शेअर करून केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
हेही वाचा – Video: ईशा केसकरच्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेचं दमदार शीर्षकगीत प्रदर्शित, पाहा व्हिडीओ
‘तारांगण’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी त्रिशा आणि तिची आई गौतमी ठोसर यांनी ‘नाळ २’च्या निमित्ताने संवाद साधला. यावेळी त्यांना त्रिशाची निवड ‘नाळ २’साठी कशी झाली?, असं विचारण्यात आलं. तेव्हा त्रिशाची आई म्हणाली की, माझ्या एका फ्रेंडने ऑडिशनबाबत सांगितलं होतं. असं असं कास्टिंग आहे वगैरे. तर एकदा तू ट्राय करून बघ. मग आम्ही लगेच हिचा पोर्टफोलियो पाठवला होता. त्यानंतर फोन आला आणि सांगण्यात आलं, ‘नाळ’ चित्रपटासाठी ऑडिशन आहे. हे ऐकून मला भारी वाटलं.
पुढे त्रिशाची आई म्हणाली, “जेव्हा ‘नाळ २’साठी ऑडिशन दिली तेव्हा ती साडे तीन वर्षांची होती. ज्या दिवशी ऑडिशन होतं, त्या दिवशी तिला १०३ ताप होता. मी तिला एकदा विचारलं, तू एका चित्रपटासाठी ऑडिशन देण्याकरता तयार आहेस का? या चित्रपटासाठी तुझी निवड झाली तर तू मोठ्या पडद्यावर दिसशील, असं सांगितलं. तेव्हा ती हो म्हणाली. मी तयार आहे, असं सांगितलं. ताप असताना, डोळे लाल असताना तिने या चित्रपटासाठी ऑडिशन दिली.”
हेही वाचा – “मोहन गोखले वर्षभर साजरी करायचे दिवाळी, पाडव्याला….”; शुभांगी गोखलेंनी पतीच्या आठवणींना दिला उजाळा
“आम्हाला जेव्हा कळालं ‘नाळ २’साठी हिची निवड झाली. तेव्हा आम्ही खूप आनंदी झालो. माझ्या बाबांनी तर अक्षरशः पार्टी दिली होती. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मी दोन-पावणे दोन महिने तिच्याबरोबर होते,” असं त्रिशाच्या आईने सांगितलं.