मराठी सिनेसृष्टीतील असे अनेक कलाकार मंडळी आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयाची छाप हिंदी सिनेसृष्टीत उमटवली आहे. सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर, प्रिया बापट, मुक्ता बर्वे, क्षिती जोग, वैभव तत्ववादी, अमेय वाघ, गिरीजा ओक, अनुजा साठे, सौरभ गोखले, श्रुती मराठे अशी अनेक मराठी कलाकारांची नाव आहेत; जे सातत्याने हिंदी चित्रपटात काम करताना दिसत आहेत. पण बऱ्याचदा मराठी अभिनेत्रींना हिंदीत कामवाल्या बाईचं काम मिळतं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वणिता खरात ‘कबीर सिंग’ चित्रपटात कामवाल्या बाईच्या भूमिकेत झळकली होती. तसंच अभिनेत्री तृप्ती खामकरने ‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपटात कामवाल्या बाईची भूमिका साकारली होती. पण, मराठी अभिनेत्रींना हिंदीत कामावल्या बाईचं काम का मिळतं? यामागचं सत्य तृप्ती खामकरने सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री तृप्ती खामकरने नुकतीच ‘सर्व काही’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी गप्पा मारताना तृप्तीने मराठी अभिनेत्रींना हिंदीत कामवाल्या बाईचं काम का दिलं जातं? याविषयी सांगितलं. तृप्ती सर्वात आधी म्हणाली, “‘कबीर सिंग’ चित्रपटातील जी जाडी बाई धावते, ती मी नाही. मी ‘कबीर सिंग’ चित्रपटासाठी ऑडिशन दिलं होतं. पण, त्यात एक जाड बाई झाडू घेऊन धावते एवढंच काम होतं.” यावर मुलाखदार म्हणाल्या, “पण तू आता कुठे कामवाल्या बाईचं काम करते?”

हेही वाचा – Video: “गरबा संपला ताई…”, इरिनाचा ‘नगाडा संग ढोल’वरील डान्स पाहून नेटकऱ्याची प्रतिक्रिया, उत्तर देत म्हणाली, “हो मला…”

तेव्हा तृप्ती म्हणाली, “आता ना…पण मी किती वर्ष तेच काम केलंय म्हणजे अर्बन कंपनीची कामवाली बाई, धर्मा फिल्म्सची कामवाली बाई…मी कुठली कुठली कामवाली बाई केली म्हणजे सगळीकडे.” त्यावर मुलाखदार म्हणाल्या, “हल्ली मी असं बघितलं की, जे मराठीतील नवोदित आणि मध्यमवयीन अभिनेत्री असतात. त्यांना बरीच कामवाल्या बाईची कामं का मिळतात?” यावेळेस तृप्ती खामकरने पडद्यामागचं सत्य सांगितलं.

हेही वाचा – Bigg Boss 18: वाइल्ड कार्ड सदस्यांमुळे ‘बिग बॉस’च्या घरातील वातावरण तापलं, कशिश कपूरने ‘या’ सदस्याला केलं टार्गेट, म्हणाली…

अभिनेत्री तृप्ती खामकर म्हणाली, “मुळात कारण ते अनफॉर्च्युनेट टाइपकास्ट आहे. तुम्ही मराठी आहात. तुम्हाला मराठी बोलता येत. तुम्ही मराठी एक्सेंटमध्ये हिंदी बोलू शकता आणि जाड असला तर मग बाईचं…म्हणजे मी वेस्टन कपडे घालून ऑडिशनला जाते तेव्हा वाव कितनी अच्छी दिख रही है तू…साडी आणली आहेस का?…असं विचारतात आणि विचारायचे.”

हेही वाचा – रुपाली भोसलेनंतर ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्याने दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदी केली आलिशान गाडी, पाहा फोटो

दरम्यान, अभिनेत्री तृप्ती खामकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने बऱ्याच हिंदी चित्रपटात काम केलं आहे. तापसी पन्नू, विक्रांत मेस्सी आणि सनी कौशलच्या ‘फिर आई हसीन दिलरुबा’ चित्रपटात तृप्ती पोलिसाच्या भूमिकेत झळकली होती. त्याआधी करीना कपूर, तमन्ना आणि क्रिती सेनॉनच्या ‘क्रू’ चित्रपटात तृप्ती पाहायला मिळाली होती.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trupti khamkar told why a marathi actress was given the role of a woman working maid in hindi movie pps