लोकप्रिय गायक, गीतकार, संगीतकार त्यागराज खाडिलकर सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. अलीकडेच ‘बातों बातों में’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यागराजने रिअॅलिटी शोसंदर्भात अनेक खुलासे केले आहेत. रिअॅलिटी शोमध्ये सर्व काही ठरलेलं असतं, असं सांगत त्याने पडद्यामागची एकंदरीत काळी बाजू समोर आणली आहे. यावेळी त्याने रिअॅलिटी शोमुळे स्पर्धकांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक खुलासा देखील केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कांचन अधिकारी यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्यागराज खाडिलकरने रिअॅलिटी शोमध्ये त्याला आलेले अनुभव सांगितले. तो म्हणाले, “काही वर्षांपूर्वी मी एका रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. मी माझी बहीण अमृता आणि माझी मुलगी राधा असे तिघजण होतो. ‘वार परिवार’ असा शो होता. अर्थात आम्ही चांगले गातो. पण अचानक आम्हाला एलिमिनेट केलं. यासंदर्भात आम्ही त्या टीमला जाऊन विचारलं असं का? तर म्हणाले, मराठी लोकांनी व्होटिंग कमी केलं. मी म्हणालो, किती केलं? आम्हाला आकडे दाखवा. कोणाला किती केलं? मग म्हणाले, तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलंय तुम्ही विचारू शकत नाही, तुम्ही ठीक वाचलं नाही. मी म्हटलं, कॉन्ट्रॅक्टचा काय संबंध? तुमची मत ठाम आहेत ना. आम्हाला तुम्ही मतांच्या आधारावर काढलं. मग आम्हाला चार्ट दाखवा. कोणाला किती मत केली आहेत. मग ते बोलायला लागले तुम्ही भांडणं करताय वगैरे. म्हटलं टेक्निकल व्होटिंगचा मुद्दा आहे तर तुम्ही दाखवा.”
हेही वाचा – ‘ही’ लोकप्रिय मराठी अभिनेत्री ज्युनियर एनटीआर व जान्हवी कपूरच्या ‘देवरा’ चित्रपटात झळकणार, फोटो केले शेअर
त्यानंतर त्यागराजला विचारलं की, या रिअॅलिटी शोमुळे लहान मुलांच्या मनावर परिणाम होत असतील? याचं उत्तर देत त्यागराज म्हणाला, “होतात. अगदी सुरुवातीला मी ‘सारेगमप’मध्ये होतो. तेव्हाचा मी उपविजेता होतो. सोनू निगम सूत्रसंचालक होते. तर तेव्हा दोन-तीन मुलांनी आत्महत्या केल्या.”
पुढे घटना सांगत म्हणाला, “एक बनारसचा मुलगा होता. तो मुलगा सेमी फायनल येईपर्यंत झीच्या ऑफिसमध्ये रुबाबाने फिरायचा आणि मोठ्यांना एकेरीत हाका मारायचा. त्याच्या डोक्यात हवा चढली होती. पण जेव्हा अंतिम फेरीत हरला तिथे त्याला असं झालं की, मी पुन्हा गावी कसा जाऊ. कुठल्या तोंडाने जाऊ. रिअॅलिटी शोमध्ये असणं हे सर्वकाही आहे, असं त्यांच्या डोक्यात असतं. हे जिंकलं म्हणजे जग जिंकलं, असं नाही. ही सुरुवात आहे. अजून खूप मोठं मैदान आहे.”
त्यानंतर त्यागराजने अजूक एक अनुभव सांगितला. तो म्हणाला, “एक मराठीतले नाटककार, दिग्दर्शक आहेत, त्यांचा मुलगा रिअॅलिटी शोमध्ये होता. त्याचं वेळेला माझी बहीण आणि स्वप्नील बांदोडकर होता. अंतिम फेरीला स्वप्नील आणि अमृता जिंकले. तो राहिला. तो महिनाभर ज्याला भेटेल त्याला, तुला निकाल पटला का रे? असं विचारत फिरायचा. मला विचारलं तेव्हा म्हणायचो, सोडणारे. जाऊ दे…झालं गेलं. मग म्हणायचा, असं कसं? हे चुकीच आहे. मी त्याच्यापेक्षा चांगला गायलो होतो. माझ्याबरोबर त्यांनी मुद्दाम केलं. त्याने ती हार इतकी मनाला लावून घेतली की, शेवटी दुर्दैवाने तो लटकला. २०-२२ वर्षांचा तरुण मुलगा होता.”
दरम्यान, त्यागराज खाडिलकर ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात झळकला होता. या पर्वात वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून त्यागराजची एन्ट्री झाली होती. पण त्यागराज जास्त काळ या कार्यक्रमात टिकला नाही. अवघ्या १५-१६ दिवसांनी तो ‘बिग बॉस’मधून बाहेर झाला.