मनोरंजन विश्वात अनेक अशी जोडपी आहेत, ज्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहिले जाते. त्यापैकी एक उमेश कामत(Umesh Kamat) व प्रिया बापट(Priya Bapat) यांची जोडी आहे. हे जोडपे सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अनेकदा ते सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. आता उमेश कामतने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना पहिलं प्रेम परत आलं, असेही अभिनेत्याने म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माझे पहिले प्रेम…

उमेश कामतने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला उमेश रिक्षामधून प्रवास करत असलेला दिसत आहे. त्यानंतर तो एका गाडीच्या शोरूममध्ये गेला असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर तो एका गाडीवरील कपडा बाजूला करतो. त्याने Triumph Scrambler 400 ही बाईक विकत घेतल्याचे दिसत आहे. उमेश व प्रियाने गाडीची पूजा केल्याचेदेखील व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. त्यानंतर उमेश गाडी चालवत असून प्रियाने व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना उमेशने कॅप्शनमध्ये लिहिले, “पहिला मिनी ब्लॉग हा असावा. माझे पहिले प्रेम आयुष्यात परत आले”, असे म्हणत त्याने बाईकचा इमोजी शेअर केला आहे. तसेच पुढे त्याने संकेत कोर्लेकरला टॅग करत लव्ह यू असे म्हटले. तर याबरोबरच प्रिया बापटला टॅग करत आजची व्हिडीओग्राफर बायको होती, असे त्याने म्हटले आहे. या व्हिडीओमध्ये हे सेलिब्रिटी जोडपे अत्यंत आनंदात दिसत आहे.

अभिनेत्याच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “उमेश सर व प्रिया मॅम अभिनंदन! संकेत सरांनासुद्धा तिथे पाहून आनंद झाला”, तर आणखी एका नेटकऱ्याने, “महाराष्ट्रातील सर्वात डॅशिंग जोडीचे अभिनंदन”, असे म्हणत प्रिया व उमेशच्या इन्स्टाग्राम अकाउंटला टॅग केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “आता पुन्हा मिरर सेट होणार गाणी ऐकण्यासाठी”, अशा शुभेच्छांचा वर्षाव करणाऱ्या अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. अनेकांनी ‘अभिनंदन’ असे म्हणत अभिनेत्याला शुभेच्छा दिल्या आहेत, तर अभिनेत्री तेजस्वी पंडितनेदेखील अभिनेत्याच्या या व्हिडीओवर कमेंट केल्याचे दिसत आहे. अभिनेत्रीने लिहिले, “शेवटी तू करून दाखवलेस”, असे म्हणत त्याचे कौतुक केले आहे.

हेही वाचा: गोविंदामुळे मुलगी टीनाला बॉलीवूडमध्ये मिळाले नाही काम; सुनिता आहुजा म्हणाली, “घर चालवण्यासाठी तिला…”

दरम्यान, प्रिया बापट व उमेश कामत हे अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर विविध व्हिडीओ शेअर करताना दिसतात. अभिनयाबरोबरच प्रिया बापटचे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसते. आता हे कलाकार कोणत्या नवीन चित्रपट, मालिका तसेच वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Umesh kamat bought triumph scrambler 400 bike did puja with wife priya bapat shared the first glimpse watch video nsp