मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय जोडतांपैकी एक म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत. त्यांच्याकडे त्यांचे चाहते आयडियल कपल म्हणून बघतात. अनेकदा ते एकमेकांबद्दल भरभरून व्यक्त होत असतात. तर आता उमेशने एका मुलाखतीमध्ये चाहत्यांना रिलेशनशिप ॲडव्हाइस दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उमेश कामात आणि प्रिया बापट यांचं ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक नुकतंच रंगभूमीवर आहे आहे. या नाटकाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या नाटकाचे आतापर्यंतचे सगळे शो हाऊसफुल झाले आहेत. या नाटकाच्या निमित्ताने प्रिया बापट हिने दहा वर्षांनंतर नाटक या माध्यमात पुनरागमन केलं. याच निमित्ताने ‘पुणे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत उमेशने चाहत्यांना रिलेशनशिप छान ठेवण्यासाठी एक सल्ला दिला आहे.

आणखी वाचा : “उमेशशी एखादी मुलगी फ्लर्ट करत असेल तर मी…”, प्रिया बापटचा खुलासा

तो म्हणाला, “तुम्ही भविष्यात होणाऱ्या गोष्टी थांबवू शकत नाही, तसंच तुम्ही भूतकाळात घडलेल्या गोष्टीही बदलू शकत नाही. तुम्ही वर्तमानात जगणं ही सर्वात महत्त्वाचं असतं. अर्थात, भूतकाळात घडलेल्या गोष्टींमधून आपण धडे घेत आपण आपलं भविष्य आणखीन चांगलं करू शकतो.” तर आता त्याच्या या बोलण्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा : Video: काश्मीरमधील शून्य डिग्री तापमानात प्रिया बापटने घेतली उमेशच्या प्रेमाची परीक्षा, व्हिडीओ चर्चेत

याचबरोबर उमेश आणि प्रिया यांनी कोणत्याही नात्यांमध्ये संवाद खूप महत्त्वाचा असतो असंही यावेळी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Umesh kamat gave important relationship advice to his fans know about it rnv