उमेश कामात आणि प्रिया बापट हे मराठी कला विश्वातील एक लोकप्रिय जोडपं. त्यांच्याकडे नेहमी त्यांचे चाहते आयडियल कपल म्हणून बघतात. उमेश आणि प्रिया देखील सोशल मीडियावर सक्रिय राहून एकमेकांबद्दल वाटणारे प्रेम व्यक्त करत असतात. आता प्रियाने उमेशच्या प्रेमाची एक मोठी परीक्षा घेतली आहे. याचा व्हिडीओ उमेशने सोशल मीडियावर नुकताच शेअर केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उमेश आणि प्रिया नुकतेच काश्मीरला फिरायला गेले आहेत. या दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ ते त्यांच्या सोशल मीडियावरून चहा त्यांचे शेअर करत आहेत. तिथे काढलेला फोटोंमध्ये त्यांनी दाखवलेल्या रोमँटिक अंदाज त्यांच्या चाहत्यांना फारच आवडला. पण आता अशातच उमेशने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

आणखी वाचा : मोठी मुलगी पायलट तर आता अलका कुबल यांच्या धाकट्या लेकीचीही कौतुकास्पद कामगिरी, आनंद व्यक्त करत म्हणाल्या…

उमेशने पोस्ट केलेल्या व्हिडीओत प्रिया नेत्याच्या प्रेमाची परीक्षा घेतल्याचा खुलासा त्याने केला. तो म्हणाला, “आता सकाळचे सात वाजले आहेत. इथे शून्य डिग्री तापमान आहे आणि मी आत्ता माझ्या बायकोबरोबर कुठे चाललोय तर इथलं भाजी मार्केट बघायला. आम्हाला भाजी घ्यायची नाहीये तर फक्त भाजी मार्केट बघायचंय. यापेक्षा प्रेमाची परीक्षा दुसरी कुठलीही असू शकत नाही. आम्ही काश्मीरमध्ये फिरायला आलोय पण सकाळी फक्त ब्रश करून भाजी मार्केट बघायला चाललो आहोत.” उमेश हे सगळं सांगत असताना प्रियाला त्याच्या बोलण्यामुळे हसू आवरत नव्हतं. या व्हिडिओच्या शेवटी उमेशने चाहत्यांना काश्मीरमधील फ्लोटिंग भाजी मार्केटचीही झलक दाखवली. आता त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर हिट झाला आहे.

हेही वाचा : “नवरा-बायकोमधील संवाद…” प्रिया बापटने शेअर केलेल्या व्हिडीओने वेधलं लक्ष

उमेश व प्रिया २०११ मध्ये विवाहबंधनात अडकले. त्याआधी ते अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या ऑफस्क्रीनबरोबरच त्यांची ऑनस्क्रीन जोडीही सुपरहिट आहे. आतापर्यंत त्यांनी नाटक,मालिका व चित्रपटांतून एकत्र काम केलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Umesh kamat shared a fun video of him and priya bapat rnv
Show comments