केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे देशाच्या राजकारणातील एक मोठे नाव आहे. भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी काम करणाऱ्या नितीन गडकरी यांची ओळख ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशीही आहे. आता त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले. त्यानंतर आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

या टीझरची सुरुवातच जबरदस्त डायलॉगने होते. ”या देशाची ओळख जेव्हा त्याच्या रस्त्याने होईल, तेव्हा मी आनंदाने म्हणू शकेन मी नितीन जयराम गडकरी…” अशा डायलॉग या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. यामुळे या चित्रपटात केवळ राजकीय नव्हे तर समाजकारणही दाखवण्यात येणार आहे.
आणखी वाचा : “मराठीतले दर्दी रसिक गेले कुठे?” मनसेचा संतप्त सवाल, म्हणाले “दुर्दैवाने, आज ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपट…”

sachin pilot
धार्मिक मुद्द्यावर बोलणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ; सचिन पायलट यांची टीका
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
navneet rana daryapur rada
VIDEO : अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा; माजी खासदारावर हल्ल्याचा प्रयत्न!
makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
Police Create Reel with Colleagues
पोलीस अधिकाऱ्याने सहकाऱ्यांबरोबर बनवली Reel, नेटकऱ्यांचे जिंकले मन, पाहा Viral Video
jagadguru rambhadracharya ji on kharge sadhu
Video: “भारतात भगवाधारींनीच राजकारण करावं, सूट-बूट घालणाऱ्यांनी…”, जगदगुरू रामभद्राचार्यांचं विधान चर्चेत!
Raosaheb Danave Beating Karyakarta
Raosaheb Danave Viral Video : फोटो फ्रेममध्ये येणाऱ्या कार्यकर्त्याला रावसाहेब दानवेंनी लाथाडलं; VIDEO व्हायरल!
Navri Mile Hitlarla
पाडवा साजरा करण्यासाठी लीलाने केली युक्ती; टायगरला बोलवताच एजेने…; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

या चित्रपटाच्या टीझरमध्ये नितीन गडकरी यांची भूमिका कोण साकारणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. ही उत्सुकता टीझरमध्येही कायम राहिली आहे. हा टीझर पाहून प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

ए एम सिनेमा आणि अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित ‘गडकरी’ हा चित्रपट येत्या २७ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती अक्षय अनंत देशमुख यांनी केली आहे. तर अनुराग राजन भुसारी, मिहिर फाटे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. या चित्रपटात नितीन गडकरी यांची भूमिका कोण साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.