बॉलिवूडमध्ये सध्या रिमेक, पौराणिक कथानकांवर आधारित चित्रपट येत आहेत मात्र मराठी चित्रपटसृष्टीत कायमच आशयघन विषय मांडले जातात. दरवर्षी मराठी चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये नामांकने, पुरस्कार पटकवतात. करोना काळानंतर आता मराठी चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी, नुकतीच एक वेगळ्या धाटणीच्या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘सोंग’. या चित्रपटातून एका वेगळ्या विषयाला प्रेक्षकांसमोर चित्रपटाचे दिग्दर्शक सज्ज आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा चित्रपट भटक्या विमुक्त जमातीमधील एका सामान्य कुटुंबावर हा चित्रपट आधारलेला आहे. आज ही कित्येक दुर्गम भागात जिथे वीज नाही तिथे शिक्षण नाही. विकासापासून वंचित असलेला समाज आणि शिक्षणाचं महत्त्व यावर सडेतोड भाष्य करणारा हा चित्रपट आहे. लेखक-दिग्दर्शक संजय कसबेकर यांनी शिवधनुष्य पेललं आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त कलाकार, तंत्रज्ञ आणि असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या चित्रपटात मिलिंद शिंदे, नागेश भोसले, विकास समुद्रे, वीणा जामकर, पूर्णिमा अहिरे यांसारख्या अनुभवी कलाकारांसह विनोद दोंदे व प्रतिभा शिंपी आदींच्या भूमिका आपल्याला पहायला मिळणार आहेत.

जेव्हा अमिताभ बच्चन यांनी प्रचार करूनही निवडणूक हरले होते मुलायम सिंह यादव; दोघांच्या मैत्रीचा खास किस्सा

या चित्रपटातील प्रख्यात अभिनेते माध्यमांशी बोलताना असं म्हणाले की समाजातील व्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी ‘अंगी मोठं धाडस असावं लागतं आणि ते निर्माते क्षितिज शिंदे आणि दिग्दर्शक संजय कसबेकर करीत आहेत, याचा मला आनंद आहे. हा विषय अत्यंत ज्वलंत असून यावर चित्रपट येणं ही ‘सोंग’ चित्रपटाची उजवी बाजू असल्याचे ही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

या चित्रपटाचे चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. मराठी चित्रपटसृष्टी नवनवे प्रयोग होताना दिसून येत आहेत. एकीकडे ऐतिहासिक चित्रपट येत आहेत, राजकीय बायोपिक येत आहेत तसेच कुटुंबांचे मनोरंजन करणारे चित्रपटदेखील येत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upcoming marathi film song based on nomadic tribes actor milind shinde is also part of film spg
Show comments