संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये मराठी अभिनेते उपेंद्र लिमयेंनी साकारलेल्या फ्रेडी पाटील या भूमिकेचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. त्यांच्या एन्ट्रीचे सगळे सीन्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याचं गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्रपटाच्या क्लायमॅक्समधून ‘अ‍ॅनिमल’चा दुसरा भाग येणार हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे ‘अ‍ॅनिमल पार्क’मध्ये उपेंद्र लिमये झळकणार की नाही? याबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकत्याच एबीपी माझा कट्टाला दिलेल्या मुलाखतीत उपेंद्र लिमये यांनी ‘अ‍ॅनिमल पार्क’मध्ये त्यांची भूमिका असेल का याबाबत भाष्य केलं आहे.

हेही वाचा : साता जन्माचे सोबती! गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर अडकले लग्नबंधनात, फोटो आले समोर

उपेंद्र लिमये म्हणाले, “माझं संदीपशी परवाच बोलणं झालं, तो मला म्हणाला, सर आता बघाच तुम्ही फ्रेडी ‘अ‍ॅनिमल पार्क’मध्ये काय काय करतो. सध्याचा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता आता पुढच्या भागात फ्रेडीची भूमिका आपण आणखी मजेदार करुया असं त्याने मला सांगितलं.”

‘अ‍ॅनिमल’च्या यशाबद्दल उपेंद्र लिमये म्हणाले, “फ्रेडीला एवढा प्रतिसाद मिळेल असं खरंच वाटलं नव्हतं. तीन दिवस मुलाखती सुरू असल्याने माझ्या संपूर्ण घराचा स्टुडिओ झाला होता. उत्तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील काही डिजिटल प्लॅटफॉर्मकडून माझ्या मुलाखती घेण्यात आल्या. एवढं भयानक यश मिळेल असं खरंच वाटलं नव्हतं.”

हेही वाचा : “मी कुठल्याही जातीचा असेन…”, मराठा आरक्षणावर नाना पाटेकरांचे रोखठोक मत; म्हणाले, “माझं सरकार ऐकणार…”

दरम्यान, ‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल, तृप्ती डिमरी यांच्या मुख्य भूमिका आहेत. उपेंद्र लिमयेंच्या फ्रेडी पाटील या भूमिकेविषयी सांगायचं झालं, तर ‘अ‍ॅनिमल’मध्ये त्यांनी फ्रेडी पाटील ही शस्त्रसाठा पुरवणाऱ्या डिलरची भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upendra limaye chance to be part of animal park movie reveals in recent interview sva 00